Rishabh Pant : ऋषभ पंत कधी खेळणार? संघ अडचणीत असताना खराब शॉट खेळून विकेट फेकली, व्हिडीओ पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rishabh Pant : ऋषभ पंत कधी खेळणार? संघ अडचणीत असताना खराब शॉट खेळून विकेट फेकली, व्हिडीओ पाहा

Rishabh Pant : ऋषभ पंत कधी खेळणार? संघ अडचणीत असताना खराब शॉट खेळून विकेट फेकली, व्हिडीओ पाहा

Dec 28, 2024 06:44 AM IST

Rishabh Pant Wicket Ind vs Aus : बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (२८ डिसेंबर) भारतीय संघ फलंदाजी करत आहे. पहिल्याच सत्रात ऋषभ पंत २८ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४७४ धावा केल्या आहेत.

Rishabh Pant : ऋषभ पंत कधी खेळणार? संघ अडचणीत असताना खराब शॉट खेळून विकेट फेकली, व्हिडीओ पाहा
Rishabh Pant : ऋषभ पंत कधी खेळणार? संघ अडचणीत असताना खराब शॉट खेळून विकेट फेकली, व्हिडीओ पाहा (AFP)

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना MCG येथे खेळवला जात आहे. २६ डिसेंबरपासून सुरू असलेल्या या बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी (२८ डिसेंबर) सकाळी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. तो सेट होता आणि चांगल्या टचमध्ये असल्याचे दिसत होता.

पण विकेटच्या मागे विचित्र शॉट खेळून पंत बाद झाला. तो केवळ २८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याची शिकार स्कॉट बोलंडने केली. पंतला खाली बसून विकेटच्या मागे फटका मारायचा होता. पण तो शॉट नीट खेळू शकला नाही आणि चेंडू हवेत गेला. नॅथन लायनने सहज झेल पकडला. 

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, वृत्त लिहिपर्यंत भारतीय संघाने ७ विकेट गमावत २२९ धावा केल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर फलंदाजी करत होते.

ऑस्ट्रेलियाने ४७४ धावा ठोकल्या

बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो खूप प्रभावी ठरला. यजमान संघाने प्रथम फलंदाजी करताना ४७४ धावा ठोकल्या. स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक १४० धावा केल्या.

याशिवाय मार्नस लॅबुशेनने ७२ धावांची, सॅम कॉन्स्टन्सने ६० धावांची तर उस्मान ख्वाजाने ५७ धावांची चांगली खेळी खेळली.

विराट-रोहित पुन्हा फ्लॉप झाले

भारतीय क्रिकेट संघाचे दोन सर्वात मोठे सुपरस्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची बॅट पूर्णपणे शांत आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू सतत संघर्ष करत आहेत.

विराट आणि रोहित करिअरच्या अंतिम टप्प्यात आहेत. हे दोन्ही फलंदाज गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नसल्यामुळे ही संघासाठी चिंतेची बाब आहे. कोहली आणि रोहित मेलबर्न कसोटीतही अपयशी ठरले. रोहित शर्मा अवघ्या ३ धावा करून बाद झाला. तर विराट कोहलीने सेट झाल्यानंतर ३६ धावांवर आपली विकेट गमावली.

Whats_app_banner