Rishabh Pant : जे कोहली-रोहितला जमलं नाही, ते ऋषभ पंतने केलं, मुंबई कसोटीत झाला खास विक्रम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rishabh Pant : जे कोहली-रोहितला जमलं नाही, ते ऋषभ पंतने केलं, मुंबई कसोटीत झाला खास विक्रम

Rishabh Pant : जे कोहली-रोहितला जमलं नाही, ते ऋषभ पंतने केलं, मुंबई कसोटीत झाला खास विक्रम

Nov 02, 2024 11:13 PM IST

Rishabh Pant, India vs New Zealand : ऋषभ पंतने टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करत एक विक्रम केला आहे. मुंबई कसोटीत त्याने ३६ चेंडूत अर्धशतक झळकावले.

Rishabh Pant : जे कोहली-रोहितला जमलं नाही, ते ऋषभ पंतने केलं, मुंबई कसोटीत केला खास विक्रम
Rishabh Pant : जे कोहली-रोहितला जमलं नाही, ते ऋषभ पंतने केलं, मुंबई कसोटीत केला खास विक्रम (AFP)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. पंत हा न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही ही कामगिरी करता आलेली नाही. या बाबतीत पंतने यशस्वी जैस्वाल याला मागे टाकले आहे.

मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात भारताकडून ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने ३६ चेंडूत अर्धशतक झळकावले. अशाप्रकारे तो न्यूझीलंडविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम यशस्वीच्या नावावर होता.

यशस्वीने याच मालिकेतील पुणे कसोटीत ४१ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. ऋषभ पंतबद्दल बोलायचे झाले तर त्याने या डावात ५९ चेंडूंचा सामना करताना ६० धावा केल्या. पंतने ८ चौकार आणि २ षटकार मारले.

दुसऱ्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर काय घडलं?

दुसऱ्या दिवसअखेर (२ नोव्हेंबर) न्यूझीलंडची धावसंख्या ९ विकेट्सवर १७१ धावा आहे. अशाप्रकारे किवी संघाची आघाडी १४३ धावांपर्यंत वाढली आहे. न्यूझीलंडकडून एजाज पटेल आणि विल्यम ओरुक नाबाद आहेत.

याआधी भारताने दुसऱ्या दिवशी कालच्या (१ नोव्हेंबर) ४ बाद ८४ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी भारतासाठी ९६ धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. न्यूझीलंडसाठी एजाज पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. एजाज पटेलने ५ फलंदाजांना बाद केले. याशिवाय मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स आणि ईश सोढीने १-१ विकेट घेतली.

Whats_app_banner