Rishabh Pant IPL Auction : ऋषभ पंत ठरला आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, लखनऊ सुपर जायंट्सने मोजले २७ कोटी रुपये
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rishabh Pant IPL Auction : ऋषभ पंत ठरला आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, लखनऊ सुपर जायंट्सने मोजले २७ कोटी रुपये

Rishabh Pant IPL Auction : ऋषभ पंत ठरला आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, लखनऊ सुपर जायंट्सने मोजले २७ कोटी रुपये

Nov 24, 2024 04:54 PM IST

IPL 2025 Auction, Rishabh Pant : ऋषभ पंत आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला लखनौने २७ कोटींमध्ये खरेदी केले.

Rishabh Pant IPL Auction : ऋषभ पंत ठरला आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, लखनऊ सुपर जायंट्सने मोजले २७ कोटी रुपये
Rishabh Pant IPL Auction : ऋषभ पंत ठरला आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, लखनऊ सुपर जायंट्सने मोजले २७ कोटी रुपये (AFP)

ऋषभ पंत याने आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. पंत यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता.

विशेष म्हणजे, IPL २०२५ च्या मेगा लिलावाचा पहिला तास खूपच रोमांचक होता. सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते, मात्र काही वेळातच हा विक्रम मोडला गेला. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांना खरेदी केले. दिल्ली कॅपिटल्सने RTM चा प्रयत्न केला, पण लखनौने लगेचच त्यांची रक्कम वाढवली. मग दिल्लीने आपले हात मागे घेतले. अशाप्रकारे लखनौने ऋषभ पंतला २७ कोटींमध्ये घेतले.

ऋषभ पंतसाठी लखनौ हैदराबादमध्ये चुरस

ऋषभ पंतसाठी लखनौ आणि आरसीबी यांच्यात सुरुवातीला युद्ध रंगले होते. पंत २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि अल्पावधीतच त्याची किंमत १० कोटींच्या पुढे गेली होती. यादरम्यान हैदराबादही शर्यतीत सामील झाले, पण लखनौनेही हार मानली नाही.

हैदराबादची मालक काव्या मारन आणि लखनऊचे मालक संजय गोयंका यांनी पंतसाठी लिलावाच्या बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत १७ कोटींच्या पुढे गेली. हैदराबाद आणि लखनौ इथेच थांबले नाहीत आणि पंतवरील बोली वाढतच गेली. लखनौने पंतसाठी २०.७५ कोटी रुपयांची बोली लावली. यानंतर हैदराबादने माघार घेतली.

मात्र, दिल्लीने आरटीएमचा वापर केला. यानंतर लखनौने पंतसाठी २७ कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने हात मागे घेतला. अशाप्रकारे पंतला २७ कोटी रुपयांना विकला गेला. लखनऊने त्याला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून संघात सामील करून घेतले.

श्रेयस अय्यरला २६.७५ कोटी रुपये मिळाले

गेल्या वर्षी कोलकात्याला चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरलाही आयपीएल २०२५ च्या लिलावात मोठी रक्कम मिळाली. अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. आता ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे.

Whats_app_banner