Rishabh Pant Most Test Dismissals Record : ब्रिस्बेनयेथे सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीत भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंत याने एका खास क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (१५ डिसेंबर) जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद केले. ख्वाजा बुमराहच्या चेंडूवर विकेटकीपप ऋषभ पंतच्या हाती झेलबाद झाला. हा झेल पकडल्यानंतर ऋषभ पंत एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे.
वास्तविक, पंतने कसोटी क्रिकेटमधील आपले १५० बळी पूर्ण केले आहेत. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये १५० बळी घेणारा तो तिसरा यष्टीरक्षक ठरला आहे. या यादीत माजी कर्णधार एमएस धोनीसह सय्यद किरमानी यांचाही समावेश आहे.
रिषभ पंतने ४१ कसोटी सामन्यांत १५० पैकी १३५ झेल घेत १५ स्टंपिंग केल्या आहेत. तर एमएस धोनी भारतासाठी विकेटच्या मागे सर्वाधिक शिकार करण्याच्या बाबतीत नंबर-वन आहे.
धोनीने आपल्या कारकिर्दीत ९० कसोटी सामन्यात २९४ खेळाडू बाद केले आहेत. यामध्ये २५६ झेल आणि ३८ स्टंपिंगचा समावेश आहे.
सय्यद किरमानी यांनी ८८ सामन्यांत १९८ खेळाडू बाद केले आहेत. त्यांनी १६० झेलसह धोनीच्या बरोबरीने ३८ स्टंपिंग केल्या होत्या.
एमएस धोनीनंतर राहुल द्रविडचे नाव येते, त्याने २०९ खेळाडू बाद केले होते. द्रविड हा प्रामुख्याने फलंदाज असला तरी त्याने स्लिपमध्ये झेल घेऊन हे सर्व बळी घेतले. तिसऱ्या स्थानावर भारताचा माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी असून त्याच्या नावावर १९८ बाद आहेत.
एमएस धोनी - २९४
सय्यद किरमानी – १९८
ऋषभ पंत – १५०
संबंधित बातम्या