भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून (१९ सप्टेंबर) प्रारंभ झाला आहे. पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
यानंतर प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताचे टॉप ऑर्डरचे फलंदाज रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे स्वस्तात बाद झाले. यानंतर दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यांनी डाव सावरला.
या दरम्यान, ऋषभ पंत आणि बांगलादेशचा विकेटकीपर लिटन दास यांच्यात वाद झाला.
टीम इंडियाची टॉप ऑर्डर अपयशी ठरली. या कारणामुळे पंतला लवकर फलंदाजीला यावे लागले. जैस्वाल आणि पंत या दोघांनी ६२ धावांची भागीदारी केली.
यादरम्यान पंतची बांगलादेशचा यष्टिरक्षक लिटन दासशी वाद झाला. फिल्डरने मारलेला थ्रो पंतला लागला, यावरून दोघांमध्ये वाद झाला. फिल्डर अंगावर थ्रो मारत आहे, अशी पंतने लिटन दासकडे केली, पण लिटन याने तो तर मारणारच असे सांगितले.
पंत - तो बघ मुद्दाम पाहून मरतोय
लिटन - हो, पायांना लागला ना? तो तर मारणारच
ऋषभ पंत - ठीक आहे मग मी पण दोन रन साठी धावेन
दोघांमधील या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारतीय फलंदाज भरघोस धावा करतील अशी अपेक्षा होती, मात्र हसन महमूदने यजमान संघाच्या आशा धुळीस मिळवल्या. हसन महमुदने रोहित शर्मा, ६ शुभमन गिल, शुन्य, विराट कोहली ६ आणि ऋषभ पंत ३९ धावा यांना तंबूत पाठवले.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.