भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफीचा थरार सुरू झाला आहे. या स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने पूर्ण झाले आहेत. आता या दरम्यानच, एक मोठी माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या स्पर्धेसाठी स्फोटक फलंदाज रिंकू सिंग याला पाचारण करण्यात आले आहे.
रिंकू सिंग भारत-बी संघाचा भाग असेल. वास्तविक, सध्या रिंकू सिंग उत्तर प्रदेश प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे, परंतु लवकरच तो इंडिया-बी संघात सामील होण्याची शक्यता आहे. दुलीप ट्रॉफीसाठी बोलावल्यावर रिंकू सिंग याने आपली प्रतिक्रियाही दिली आहे. रिंकू सिंगने सांगितले की, तो खूप मेहनत करतो आणि पुढचा विचार करत नाही'.
रिंकू सिंगने सांगितले की, माझे काम सतत मेहनत करणे आहे. दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाल्याने मला खूप आनंद झाला आहे. संघ जाहीर झाले तेव्हा माझी निवड झाली नव्हती. माझी जबाबदारी कठोर परिश्रम करण्याची आहे, जी मी करत आहे".
रिंकू सिंग सध्या उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये मेरठ मावेरिक्सचे प्रतिनिधित्व करत आहे. आतापर्यंत या संघाने १० सामने खेळले आहेत, ज्यात ८ जिंकले आहेत.
रिंकू सिंगच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने २ एकदिवसीय सामन्यांसोबतच २३ टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्याने आयपीएलचे ४५ सामने खेळले आहेत.
रिंकू सिंगच्या नावावर T20 फॉरमॅटमध्ये ४१८ धावा आहेत. या फॉरमॅटमध्ये रिंकू सिंगने १७४य१७ च्या स्ट्राइक रेटने आणि ५९.७१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर आयपीएल सामन्यांमध्ये रिंकू सिंगने १४३.३४ च्या स्ट्राइक रेटने आणि ३०.७९ च्या सरासरीने ८९३ धावा केल्या आहेत.