Rinku Singh Priya Saroj Net Worth : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रिंकू सिंग याचे लग्न ठरले आहे. रिंकू सिंग उत्तर प्रदेशातील खासदार प्रिया सरोज यांच्याशी लग्न करणार आहे. प्रियाचे वडील तुफानी सरोज हे देखील खासदार राहिले आहेत. अशा परिस्थितीत रिंकू आता त्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सामील झाला आहे, ज्यांनी राजकारणी कुटुंबात लग्न केले आहे.
रिंकू हा भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे तर प्रिया ही खासदार आहे तसेच व्यवसायाने वकील आहे.
रिंकू सिंग सध्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी तयारी करत आहे. याशिवाय तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो.
केकेआरने रिंकूला १३ कोटींची मोठी रक्कम देऊन रिटेन केले आहे. यापूर्वी रिंकूला KKR कडून फक्त ५५ लाख रुपये पगार मिळत होता. अशा स्थितीत, रिंकू सिंग आणि होणाऱ्या पत्नीची एकूण संपत्ती किती आहे आणि कोण किती श्रीमंत आहे हे जाणून घेऊया.
रिंकू सिंगने खूप गरिबी पाहिली आहे. त्याने कठोर परिश्रमानंतर यश मिळवले आहे. एक काळ असा होता की रिंकूकडे चपला घेण्यासाठीही पैसे नव्हते.
रिंकूचे वडील घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवायचे आणि त्याचा भाऊ ऑटो रिक्षा चालवायचा, पण आज रिंकूने आपल्या मेहनतीने त्याच्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढले आहे. तसेच, त्याने करोडो रुपयांचे राजमहालासारखे घरही विकत घेतले आहे.
रिंकू सिंगच्या एकूण संपत्तीर ८ ते ९ कोटींच्या दरम्यान आहे. रिंकूने गेल्या वर्षीच ३ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे आलिशान घर घेतले आहे.
याआधी रिंकूकडे इतके पैसे नव्हते. रिंकूला IPL २२०५ साठी KKR कडून १३ कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली आहे.
रिंकू सिंग याची होणारी पत्नी प्रिया सरोज हिच्या संपत्तीबद्दल बोलायचे तर ती फक्त ११.२५ लाख रुपये आहे.
प्रियाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रानुसार, तिच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ११.३५ लाख रुपये आहेत. दागिन्यांच्या नावावर तिच्याकडे केवळ ३२ हजार रुपयांचे सोने आहे. याशिवाय तिच्या नावावर कोणतीही जमीन किंवा घर नाही. यासोबतच प्रियावर दोन गुन्हेही दाखल आहेत.
संबंधित बातम्या