Rinku Singh News: मुले जेव्हा आई-वडिलांना काही भेटवस्तू देतात, तेव्हा त्यांचा आनंद पाहण्यासारखा असतो. भारतीय संघ आणि कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज रिंकू सिंहनेही आपल्या वडिलांना खास भेट दिली आहे. त्यांनी वडील खानचंद्र सिंह यांना कावासाकी निंजा नावाची एक जबरदस्त बाईक भेट दिली आहे. या बाईकची किंमत ३.१९ लाख रुपये आहे. रिंकू सिंहच्या वडिलांचा बाईक चालवतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
रिंकू सिंहने ऑगस्ट २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २७ वर्षीय क्रिकेटपटूने आतापर्यंत दोन वनडे आणि ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी केकेआरने रिंकूला १३ कोटी रुपयांना रिंकूला संघात कायम ठेवले आहे.
उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये जन्मलेल्या रिंकूने मोठा संघर्ष करत क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. रिंकू आणि त्याच्या कुटुंबाला खूप संघर्ष करावा लागला आहे. एकेकाळी त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट सोडून काही काम करण्याचा सल्ला दिला होता, जेणेकरून कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल. परंतु, एक दिवस देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रिंकूने स्वत:वर विश्वास ठेवला आणि मेहनतीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले. आज रिंकूची जगातील स्फोटक फलंदाजांमध्ये गणाना केली जात आहे.
यशाचे शिखर गाठल्यानंतर रिंकूने आपल्या आई-वडिलांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले आहे. नुकतीच रिंकूने आपल्या वडिलांसाठी नवी बाईक खरेदी केली. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये रिंकूचे वडील आपली नवीन बाईक चालवण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
रिंकू सिंह लग्नाच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिंकू समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज सोबत लग्न करणार आहे. प्रियाचे वडील आणि केराकत तुफानी येथील सपा आमदार सरोज यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाने अलिगडमध्ये रिंकूच्या वडिलांशी लग्नाबाबत चर्चा केली होती आणि दोन्ही पक्षांनी त्यास सहमती दर्शविली होती. तीन वेळा खासदार राहिलेल्या सरोज यांनी सांगितले की, त्यांची मुलगी आणि रिंकू यांची भेट एका मित्राच्या माध्यमातून झाली होती, ज्याचे वडीलही क्रिकेटपटू आहेत. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या २२ जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत रिंकू सिंह खेळताना दिसणार आहे.
संबंधित बातम्या