मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024 : हा भारतीय सर्वाधिक विकेट घेणार, तर हा ऑस्ट्रेलियन सर्वाधिक धावा करणार, रिकी पॉंटिंगची मोठी भविष्यवाणी

T20 WC 2024 : हा भारतीय सर्वाधिक विकेट घेणार, तर हा ऑस्ट्रेलियन सर्वाधिक धावा करणार, रिकी पॉंटिंगची मोठी भविष्यवाणी

May 30, 2024 09:13 PM IST

Ricky Ponting On T20 World Cup 2024 : रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेईल, तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर असेल, अशी भविष्यवाणी केली आहे.

हा भारतीय सर्वाधिक विकेट घेणार, तर हा ऑस्ट्रेलियन सर्वाधिक धावा करणार, रिकी पॉंटिंगची मोठी भविष्यवाणी
हा भारतीय सर्वाधिक विकेट घेणार, तर हा ऑस्ट्रेलियन सर्वाधिक धावा करणार, रिकी पॉंटिंगची मोठी भविष्यवाणी (AFP)

वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने २ जूनपासून टी-20 विश्वचषकाचा महाकुंभ सुरू होत आहे. या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

वेस्ट इंडिज आणि अमेरिका टी-20 विश्वचषकाचे यजमानपदासाठी सज्ज झाले आहेत. ही स्पर्धा २ जूनपासून सुरू होत आहे. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ५ जूनपासून आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करेल.

मात्र, याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेईल, तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर असेल, अशी भविष्यवाणी केली आहे.

टी-20 विश्वचषकात बुमराह सर्वाधिक विकेट घेईल

रिकी पाँटिंग म्हणाला की, जसप्रीत बुमराह एक महान गोलंदाज आहे, तो गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे, या वेगवान गोलंदाजाने आयपीएलमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली.

रिकी पाँटिंग पुढे म्हणाला, जसप्रीत बुमराहकडे नवीन चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे, परंतु या गोलंदाजाला सर्वात खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची इकॉनॉमी. जसप्रीत बुमराह प्रति षटक ७ पेक्षा कमी धावा देतो, जे टी-20 फॉरमॅटमध्ये प्रशंसनीय आहे. तो तुमच्यासाठी विकेटही घेईल.

टी-20 विश्वचषकात हेड सर्वाधिक धावा करेल

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करेल, असा विश्वास रिकी पाँटिंगला आहे. रिकी पाँटिंग म्हणाला की, ट्रॅव्हिसने सर्व फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे, मग तो लाल चेंडू असो किंवा पांढरा चेंडू... ट्रॅव्हिस हेडने ज्या शैलीत फलंदाजी केली ती विलक्षण आहे. तो बेफिकीरपणे खेळत आहे.

अलीकडे, ट्रॅव्हिस हेडने आयपीएलमध्ये खूप धावा केल्या, हा खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषकात ट्रॅव्हिस हेड सर्वाधिक धावा करेल, असे मला वाटते.

टी-२० वर्ल्डकप २०२४