BBL Video : मुलाच्या गोलंदाजीवर षटकार लागला, प्रेक्षकांमध्ये बसलेल्या वडिलांनी घेतला झेल, व्हिडीओ पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BBL Video : मुलाच्या गोलंदाजीवर षटकार लागला, प्रेक्षकांमध्ये बसलेल्या वडिलांनी घेतला झेल, व्हिडीओ पाहा

BBL Video : मुलाच्या गोलंदाजीवर षटकार लागला, प्रेक्षकांमध्ये बसलेल्या वडिलांनी घेतला झेल, व्हिडीओ पाहा

Jan 11, 2025 08:09 PM IST

Adelaide Strikers vs Brisbane Heat : बिग बॅश लीगमध्ये आज ॲडलेड स्ट्रायकर्स आणि ब्रिस्बेन हीट आमनेसामने होते. या सामन्यात एक मजेशीर घटना घडली. फलंदाजाने मारलेला षटकार प्रेक्षकांमध्ये बसलेल्या गोलंदाजाच्या वडिलांच्या हातत गेला.

BBL Video : मुलाच्या गोलंदाजीवर षटकार लागला, प्रेक्षकांमध्ये बसलेल्या वडिलांनी घेतला झेल, व्हिडीओ पाहा
BBL Video : मुलाच्या गोलंदाजीवर षटकार लागला, प्रेक्षकांमध्ये बसलेल्या वडिलांनी घेतला झेल, व्हिडीओ पाहा

बिग बॅश लीग २०२४-२५ चा ३१वा सामना खूपच रोमहर्षक झाला. या सामन्यात ॲडलेड स्ट्रायकर्स आणि ब्रिस्बेन हीट आमनेसामने होते. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी विशेषतः फलंदाजीत धुमाकूळ घातला.

पण या सामन्यात एक खूपच खास घटना घडली, या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे अशी घटना क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदाच घडली आहे.

खरं तर, या सामन्यात फलंदाजाने षटकार लगावला. तो थेट प्रेक्षकांमध्ये बसलेल्या गोलंदाजाच्या वडिलांच्या हातात जाऊन पडला. विशेष म्हणजे या गोलंदाजाचा हा पदार्पणाचा सामना होता.

ॲडलेड स्ट्रायकर्सकडून आज लियाम हॅस्केट याने पदार्पण केले. त्याच्या गोलंदाजीवर ब्रिस्बेन हीटच्या नॅथन मॅकस्विनी याने लेग साइडवर शानदार शॉट खेळला आणि त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवले. पण, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लियाम हॅस्केट याचे वडील स्टेडियममध्ये सामना पाहत होते आणि ते ज्या ठिकाणी बसले होते, त्याच ठिकाणी हा षटकार गेला. मग काय त्यांनी तो चेंडू झेलला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लियाम हॅस्केटने पदार्पणाच्या सामन्यात २ विकेट घेतल्या, पण त्याने खूप जास्त धावा दिल्या. त्याने ३ षटकात ४३ धावा दिल्या.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ॲडलेड स्ट्रायकर्सने ५६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ॲडलेड स्ट्रायकर्स संघाने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून २५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ब्रिस्बेन हीट संघ २० षटकांत १९५ धावांच करू शकला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या