मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WPL 2024 Final : आरसीबीचे चाहते रात्रभर रस्त्यावर, पहिली ट्रॉफी जिंकल्यानंतर तुफान जल्लोष, व्हिडीओ पाहा

WPL 2024 Final : आरसीबीचे चाहते रात्रभर रस्त्यावर, पहिली ट्रॉफी जिंकल्यानंतर तुफान जल्लोष, व्हिडीओ पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 18, 2024 02:22 PM IST

RCB Fand On the Streets Video : आरसीबीच्या पुरूष संघाने आयपीएलचे १६ सीझन खेळले. यात ते तीनदा फायनलमध्ये पोहोचले पण त्यांना एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाही.

RCB Fand On the Streets Video
RCB Fand On the Streets Video

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) महिला प्रीमियर लीग २०२४ चे (WPL 2024) विजेतेपद जिंकले आहे. WPL च्या अंतिम सामन्यात (WPL 2024 Final ) आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्ल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १९.३ षटकात ११५ धावा करत सामना जिंकला.

आरसीबीने ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा केला. वास्तविक, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा फॅन बेस हा सर्वात लॉयल फॅनबेस समजला जातो. कारण आरसीबीचा संघ सामना जिंको अथवा हरो चाहते नेहमीच मोठ्या उत्साहाने संघाला सपोर्ट करताना दिसतात.

आरसीबीच्या पुरूष संघाने आयपीएलचे १६ सीझन खेळले. यात ते तीनदा फायनलमध्ये पोहोचले पण त्यांना एकदाही ट्रॉफी जिंकता आली नाही. अशा परस्थितीत महिला संघाने जिंकलेली WPL ची ट्रॉफी आरसीबीच्या संघाला खूपच मौल्यवान आहे.

आरसीबीने जेतेपद पटकावल्याचे पाहून चाहत्यांमध्ये वेगळेच वेडेपण पाहायला मिळाले. आरसीबीच्या विजयानंतर रविवारी (१७ मार्च) रात्री अनेक चाहते बेंगळुरूमध्ये रस्त्यावर उतरले आणि जल्लोष केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने चाहते रस्त्यावर दिसत आहेत. या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. कोणत्याही फ्रेंचायझीची अशी क्रेझ तुम्हाला क्वचितच पाहायला मिळेल.

दिल्लीला हरवून विजेतेपद पटकावले

महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आरसीबीसमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान होते. दिल्ली गेल्या मोसमात उपविजेती ठरली होती. मात्र, यावेळीही ते उपविजेतेच राहिले. पण त्यांना पराभूत करणे आरसीबीसाठी इतके सोपे नव्हते.

सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीने अवघ्या ७.१ षटकात ६४ धावा केल्या होत्या. दिल्ली २०० धावांचा आकडा गाठेल असे वाटत होते. पण यानंतर अचानक दिल्ली गळती लागली. दिल्लीने ८व्या षटकात ३ विकेट गमावल्या. यानंतर त्यांचा संघ सावरू शकला नाही.

यानंतर आरसीबीने सावध फलंदाजी करत ३ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून सोफी डिव्हाईनने ३२, स्मृती मानधना ३१ धावा केल्या. तर एलिस पेरीने नाबाद ३५ धावांची खेळी केली.

WhatsApp channel