मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs SRH Live Streaming: बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात आज लढत; कधी, कुठे पाहणार सामना?

RCB vs SRH Live Streaming: बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात आज लढत; कधी, कुठे पाहणार सामना?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 15, 2024 12:46 PM IST

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२४ मधील ३०वा सामना खेळला जाणार आहे.

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात  खेळला जाणार आहे.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे.

IPL 2024: आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद (Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad) यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरूच्या Bengaluru) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) खेळला जाणार आहे. या हंगामात आरसीबीने निराशाजनक कामगिरी केली आहे. बंगळुरूला आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे, हैदराबादने पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील बंगळुरूचा संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.

ट्रेंडिंग न्यूज

बंगळुरू घरच्या मैदानावर चौथा सामना खेळणार आहे. याच मैदानावर त्यांनी पंजाब किंग्जविरुद्ध एकमेव विजय मिळवला. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत बंगळुरूचा संघ दहाव्या स्थानावर आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. हैदराबादने गेल्या सामन्यात पंजाबविरुद्ध दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

Rohit Sharma Video : रोहित शर्मा उप्स मोमेंटचा शिकार, झेल घेताना पँटने दगा दिला, नेमकं काय घडलं? पाहा

कधी, कुठे पाहणार सामना?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सोमवारी (१५ एप्रिल २०२४) आयपीएलमधील ३०वा सामना खेळला जाईल. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

MS Dhoni New Record: धोनीनं हार्दिकला धू-धू धुतलं; ५०० स्ट्राईक रेटने फलंदाजी, रचला नवा विक्रम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ:

फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, रीस टोप्ले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज, आकाश दीप, सौरव चौहान, सुयश प्रभात, सुयश प्रभात सिंह, राजन कुमार, कर्ण शर्मा, टॉम कुरन, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, कॅमेरॉन ग्रीन, अनुज रावत, मनोज भंडागे, यश दयाल, हिमांशू शर्मा.

सनरायझर्स हैदराबादचा संघ:

हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अनमोलप्रीत सिंह, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंह, विजयकांत वायस्कांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंह, मयांक अग्रवाल.

IPL_Entry_Point