RCB Vs PBKS IPL 2024 : पंजाबने आरसीबीला दिले १७७ धावांचे लक्ष्य, शिखर धवनची दमदार फलंदाजी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB Vs PBKS IPL 2024 : पंजाबने आरसीबीला दिले १७७ धावांचे लक्ष्य, शिखर धवनची दमदार फलंदाजी

RCB Vs PBKS IPL 2024 : पंजाबने आरसीबीला दिले १७७ धावांचे लक्ष्य, शिखर धवनची दमदार फलंदाजी

Published Mar 25, 2024 09:15 PM IST

RCB vs PBKS IPL 2024 Scorecard : आयपीएल २०२४ मध्ये आज पंजाब आणि बंगळुरूचे संघ आमने सामने आहेत. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या आहेत.

RCB vs PBKS Indian Premier League 2024 पंजाबने आरसीबीला दिले १७७ धावांचे लक्ष्य,  शिखर धवनची दमदार फलंदाजी
RCB vs PBKS Indian Premier League 2024 पंजाबने आरसीबीला दिले १७७ धावांचे लक्ष्य, शिखर धवनची दमदार फलंदाजी (AP)

RCB vs PBKS Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ चा सहावा सामना आज (२५ मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर पंजाबने निर्धारित २० षटकात ६ बाद १७६ धावा केल्या आहेत. आता आरसीबीला सामना जिंकण्यासाठी १७७ धावा कराव्या लागणार आहेत.

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शशांक सिंगने २०व्या षटकात एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर २१ धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीमुळेच पंजाबने १७० धावांचा आकडा ओलांडला. त्याचवेळी हरप्रीत ब्रारही दोन धावा करून नाबाद राहिला.

त्याआधी पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावा केल्या. सॅम करनने २३ आणि जितेश शर्माने २७ रन्सची इनिंग खेळली. अखेरीस शशांक सिंग ८ चेंडूत २१ धावा करून नाबाद परतला. तर आरसीबीतर्फे ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल. 

इम्पॅक्ट सब: सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, विजयकुमार वैश्याक, स्वप्नील सिंग

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभस्मरण सिंग, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर. 

इम्पॅक्ट सब: अर्शदीप सिंग, रिले रोसौ, तनय थियागराजन, हरप्रीत भाटिया, विदावथ कावेरप्पा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या