मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs PBKS Live Streaming: बंगळुरु- पंजाबमध्ये आज लढत; कधी, कुठे पाहायचा लाईव्ह सामना?

RCB vs PBKS Live Streaming: बंगळुरु- पंजाबमध्ये आज लढत; कधी, कुठे पाहायचा लाईव्ह सामना?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 25, 2024 01:25 PM IST

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Live Streaming: आरसीबी आणि पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल २०२४ मधील सहावा सामना खेळला जाणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात आज लढत पाहायला मिळणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात आज लढत पाहायला मिळणार आहे.

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स एकमेकांशी भिडणार आहे. आरसीबीला त्यांच्या पहिल्या सामन्यात चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, पंजाबने त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्लीच्या संघाला पराभवाची धुळ चारली आहे. यामुळे आजच्या सामन्यात आरसीबीचा संघ विजयी खाते उघडण्यासाठी मैदानात उतरेल. तर, पंजाबचा संघ दुसऱ्या विजयाच्या शोधात मैदानात पाऊल ठेवणार आहे. आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येईल, हे जाणून घेऊयात.

आरसीबीला त्याच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून सहा विकेट्सने पराभव केला होता. तर पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर चार विकेट्स राखून विजय मिळवला होता. आता आज होणाऱ्या सामन्यावर दोन्ही संघांची नजर असेल. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब दोन गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे आणि आरसीबी नवव्या स्थानावर आहे. फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघ या सामन्यात विजय मिळवून आपला निव्वळ रनरेट सुधारण्याचा प्रयत्न करेल.

मुंबईने जिंकलेला सामना गमावला, स्पेन्सर जॉन्सन-मोहित शर्माच्या बळावर गुजरातचं धमाकेदार पुनरागमन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना कधी आहे?

-आयपीएल २०२४ च्या सहाव्या सामन्यात राजस्थान आणि लखनौ एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना २५ मार्च २०२४ रोजी होणार आहे.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कुठे होणार?

- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब यांच्यातील सामना बंगळुरुच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल. यापूर्वी अर्धातास म्हणजेच ७ वाजता नाणेफेक होईल.

 

आयपीएलच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. स्टार स्पोर्ट्स १ एचडी वर इंग्लिशमध्ये लाइव्ह कॉमेंट्री उपलब्ध असेल. तर, हिंदी भाषेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टार स्पोर्ट्स हिंदी HD हा पर्याय आहे. याशिवाय, बंगाली, कन्नड, तेलगू आणि तामिळसह इतर भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येणार आहे. भारतातील जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. हा सामना जिओ सिनेमावर प्रसारित होत आहे. या ॲपमध्ये थेट सामने पाहण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या फोनमध्ये Jio Cinema ॲप इन्स्टॉल करून आयपीएलचा सामना मोफत पाहू शकता. याशिवाय तुम्ही marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

IPL_Entry_Point