RCB vs PBKS Head to Head: बंगळुरु- पंजाबमध्ये कोणत्या संघाचा दबदबा, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs PBKS Head to Head: बंगळुरु- पंजाबमध्ये कोणत्या संघाचा दबदबा, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

RCB vs PBKS Head to Head: बंगळुरु- पंजाबमध्ये कोणत्या संघाचा दबदबा, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

Mar 25, 2024 01:56 PM IST

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Head to Head Record: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आज एकमेकांशी भिडणार आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि शिखर धवन यांच्यात आज क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे,
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि शिखर धवन यांच्यात आज क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे,

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या सलामीच्या सामन्यात आरसीबीला गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला. आयपीएल २०२४ च्या सहाव्या सामन्यात फाफ डु प्लेसिस अँड कंपनीचा सामना शिखर धवनच्या पंजाब किंग्जशी होणार आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात आरसीबीची शॉर्ट पिच बॉल स्ट्रॅटेजी अपयशी ठरली.

चेन्नईविरुद्ध सामन्यात आरसीबीचे फलंदाज रजत पाटीदार आणि मॅक्सवेल खातेही उघडू शकले नाहीत. कर्णधार डुप्लेसिसने ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर, दिनेश कार्तिक (३८ धावा) आणि अनुज रावत (४८ धावा) च्या शानदार खेळीच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत ६ विकेट्स गमावून १७३ धावापर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाने हा सामना १८.४ षटकांत जिंकला.

पीबीकेएसचा स्ट्राईक बॉलर अर्शदीप सिंगविरुद्ध कोहलीचा रेकॉर्ड प्रभावी आहे. अर्शदीपने अद्याप आयपीएलमध्ये विराट कोहलीला बाद केलेले नाही. कोहलीने अर्शदीपविरुद्ध २३ चेंडूत ४४ धावांची खेळी केली आहे. अर्शदीपचा सहकारी हरप्रीत ब्रारने आरसीबीच्या माजी कर्णधाराला दोनवेळा बाद केले आहे. ब्रारने मॅक्सवेलला १४ चेंडूत ३ वेळा बाद केले आहे. आरसीबीचा माजी स्टार हर्षल पटेलविरुद्ध खेळताना कोहलीने २७ चेंडूत ४३ धावा केल्या आहेत. त्याच्याविरुद्ध कोहली फक्त एकदाच बाद झाला आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून पंजाब किंग्ज आरसीबीशी भिडणार आहे.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये आरसीबीने पीबीकेएसविरुद्ध १४ सामने जिंकले आहेत. आयपीएल २०२४ च्या सहाव्या दिवशी पंजाब आरसीबीवर १८ वा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत आरसीबी नवव्या आणि पंजाबचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग