RCB vs Mumbai Indians : महिला प्रीमियर लीगचा नववा सामना आज (२ मार्च) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर मंबईची कर्णधार नॅट सीव्हर ब्रंटने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
यानंतर आरसीबीचा संघ २० षटकात ६ बाद १३१ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात मुंबईने अवघ्या १५.१ षटकात १३३ धावा करत सामना जिंकला.
मुंबईकडून अमेलिया केरने २४ चेंडूत ४० धावा ठोकल्या. तर तिच्याआधी यास्तिका भाटियाने ३१ धावांची खेळी केली.
या मोसमात मुंबईचा आरसीबीविरुद्धचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी गेल्या मोसमात मुंबईने आरसीबीला दोनदा पराभूत केले होते. त्याचवेळी आरसीबीचा या मोसमातील हा दुसरा पराभव आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबीने खूपच वाईट फलंदाजी केली. त्यांच्याकडून केवळ एलिस पेरीने एकाकी झुंज दिली. बाकीच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली.
आरसीबीच्या डावात सर्वात मोठी भागिदारी डावाच्या शेवटी आली. ॲलिस पेरी आणि जॉर्जिया वेअरहॅम यांनी ५२ धावांची भागीदारी केली.
तत्पूर्वी, सलामीला फलंदाजीला आलेली कर्णधार स्मृती मानधना केवळ ९ धावा करून बाद झाली. संघाला दुसरा धक्का तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सबिनेनी मेघनाच्या रूपाने बसला. तिला केवळ ११ धावा करता आल्या. यानंतर सोफी डिव्हाई ९, ऋचा घोष ७, सोफी मोलिनेक्स १२ यांना फलंदाजीत विशेष काही करता आले नाही.
शेवटी जॉर्जिया वेरेहमने २७ धावा केल्या. तर एलिस पेरी ३८ चेंडूत ४४ धावा करून नाबाद राहिली. मुंबईकडून नॅट सिव्हर ब्रंट आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. तर इसी वोंग आणि सायका इशाक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.
संबंधित बातम्या