मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs MI, WPL 2024: मुंबई इंडियन्सला हरवून आरसीबीची प्लेऑफमध्ये धडक!

RCB vs MI, WPL 2024: मुंबई इंडियन्सला हरवून आरसीबीची प्लेऑफमध्ये धडक!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 12, 2024 11:57 PM IST

RCB Beats MI: वूमन प्रीमियर लीगच्या १९व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सने पराभव केला.

RCB
RCB

WPL 2024: वूमन प्रीमियर लीग २०२४ च्या १९व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने बंगळुरूसमोर ११४ धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य बंगळुरुच्या संघाने १५ षटकांत गाठले. बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा सात विकेट राखून पराभव केला. या विजयासह बंगळुरुच्या संघाने प्लेऑफचं तिकीट मिळवले.स्मृती मानधनाचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा संपूर्ण संघ १९ षटकांत ११३ धावांत गारद झाला. एलिस पेरीने घातक गोलंदाजी करत ६ विकेट घेतले. बेंगळुरूने १५ षटकांत तीन विकेट गमावून लक्ष्य गाठले. बंगळरुकडून एलिस पेरीने नाबाद ४० धावा आणि रिचा घोषने नाबाद ३६ धावांची खेळी केली.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र, या पराभवामुळे मुंबईला आता पहिले स्थान गमवावे लागले.मुंबईने साखळी फेरीतील सर्व आठ सामने खेळले असून त्यांचे १० गुण आहेत. यासह यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स बाहेर आहेत. यूपीचे सहा तर गुजरातचे चार गुण आहेत. अव्वल क्रमांकाचा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन:

हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, प्रियांका बाला (विकेटकिपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.

 

आरसीबीची प्लेईंग इलेव्हन:

स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंह.

WhatsApp channel