मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs LSG Head To Head: बंगळुरू आणि लखनौमध्ये कोणता संघ मारणार बाजी, काय सांगतायेत आकडे?

RCB vs LSG Head To Head: बंगळुरू आणि लखनौमध्ये कोणता संघ मारणार बाजी, काय सांगतायेत आकडे?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 02, 2024 04:09 PM IST

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Head to Head Record: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात कोणत्या संघाचा दबदबा आहे, हे पाहुयात.

आयपीएलच्या पंधराव्या सामन्यात बंगळुरू आणि लखनौ यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.
आयपीएलच्या पंधराव्या सामन्यात बंगळुरू आणि लखनौ यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

IPL 2024: आयपीएलच्या १५व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स एकमेकांसमोर येणार आहेत. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. लखनौने मागील सामन्यात पंजाब किंग्जला पराभूत करून मोसमातील पहिला विजय नोंदवला होता. तर, बंगळुरूने केकेआरविरुद्धचा मागील सामना गमावल्यानंतर हंगामातील दुसरा पराभव नोंदवला. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये आज रंजक स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी बंगळुरू आणि लखनौ यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.

यंदाच्या हंगामात दोन्ही संघाला प्रत्येकी एक-एक सामन्यात विजय मिळवता आला. परंतु, लखनौचा संघ आज त्यांचा तिसरा सामना खेळायला मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, बंगळुरूने तीन पैकी दोन सामने गमावले आहेत. लखनौने राजस्थानविरुद्ध खेळलेला पहिला सामना २० धावांच्या फरकाने गमावला होता. त्यानंतर पंजाबविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात २१ धावांनी विजय मिळवला. तर आरसीबीने चेन्नईविरुद्धचा पहिला सामना गमावला आणि पंजाब किंग्जविरुद्धचा दुसरा सामना जिंकला. यानंतर तिसऱ्या सामन्यात केकेआरकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

RCB vs LSG Live Streaming: आरसीबी आणि लखनौ यांच्यात आज लढत; कधी, कुठे आणि कसा पाहणार सामना?

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स आतापर्यंत चार वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी चार सामन्यात आरसीबीने लखनौला पराभवाची धुळ चारली आहे. तर, फक्त एका सामन्यात लखनौच्या संघाला विजय मिळवता आला आहे.

IPL 2024 Fatest Ball: जेराल्ड कोएट्झीनं टाकला यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू, मयंक यादवचा विक्रम मोडला!

लखनौ सुपर जायंट्स संघ:

क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (कर्णधार), आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ, नवीन-उल-हक , अमित मिश्रा, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, कृष्णप्पा गौथम, मॅट हेन्री, दीपक हुडा, प्रेरक मांकड, यश ठाकूर, शिवम मावी, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, शमर जोसेफ, अर्शिन कुलकर्णी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत (विकेटकिपर), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार विशक, दिनेश कार्तिक, कर्ण शर्मा , रीस टोप्ले, टॉम करन, स्वप्नील सिंह, लॉकी फर्ग्युसन, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, सुयश प्रभुदेसाई, मनोज भंडागे, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशू शर्मा.

IPL_Entry_Point