RCB vs LSG Toss Report: आरसीबीनं टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs LSG Toss Report: आरसीबीनं टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

RCB vs LSG Toss Report: आरसीबीनं टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

Updated Apr 02, 2024 07:22 PM IST

RCB vs LSG: आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनौविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
लखनौविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IPL 2024: आयपीएलच्या पंधराव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघाने लीगमध्ये आतापर्यंत प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. बंगळुरूला तीनपैकी एक सामन्यात आणि लखनौला दोनपैकी एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. हा सामना जिंकून दोन्ही संघ गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.

आरसीबीचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. तीन सामन्यांत त्याचे दोन गुण आहेत. त्याचा नेट रनरेटही चांगला नाही. आरसीबीला त्यांच्या मागच्या सामन्यात कोलकाता नाइट रायजर्सविरुद्ध सामन्यात सात विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. लखनौचा संघ आज त्यांना आव्हान देऊ शकतो.

IPL 2024 Schedule: आयपीएल २०२४ मधील दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, बीसीसीआयची घोषणा!

 

आरसीबीची मधल्या फळीतील फलंदाजी

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाला कमी लेखता येणार नाही. संघातील स्टार फलंदाज विराट कोहलीने तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावले आहेत.मात्र, त्याच्याव्यतिरिक्त आरसीबीच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाज धावा काढण्यास अपयशी ठरत आहेत. फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीनला त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी करता आलेली नाही.

Viral Video: चौकार रोखण्यासाठी चक्क ५ खेळाडू चेंडूमागे धावले; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल!

 

आरसीबीची निराशाजनक गोलंदाजी

आरसीबीचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद सिराजला काही खास कामगिरी करता आली नाही. सिराजला तीन सामन्यात फक्त दोन विकेट घेता आल्या आहेत. पॉवरप्लेमध्ये विकेट मिळवण्यास आरसीबीचा संघ अपयशी ठरत आहे. मात्र, गेल्या मोसमात संघाच्या गोलंदाजांनी पहिल्या सहा षटकांत चांगली कामगिरी केली होती. संघाने वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला ११.५ कोटी रुपयांना विकत घेतले. मात्र, तो ही पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग