IPL 2024: बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने आरसीबीला २८ धावांनी पराभूत केले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाने २० षटकात ५ विकेट्स गमावून १८१ धावा केल्या. लखनौकडून क्विंटन डी कॉक (८१ धावा) आणि निकोलस पूरनने (४० धावा) महत्त्वाची खेळी केली. त्यानंतर मयांक यादव आणि नवीन उल हक यांनी भेदक गोलंदाजी करत बंगळुरूच्या संघाला अवघ्या १५३ धावांवर रोखले.
या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक आणि निकोलस पूरनच्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौने बंगळुरूसमोर १८१ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ १५३ धावांवर गारद झाला. या सामन्यात लखनौच्या मयांक यादवने पुन्हा एकदा कहर केला. त्याने या सामन्यात सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पंजाबविरुद्ध गेल्या सामन्यातही त्याने तीन विकेट्स घेतल्या होत्या.
बंगळुरूच्या संघाचा चार सामन्यांतील तिसरा पराभव आहे. दुसरीकडे लखनौच्या संघाने तीन सामन्यात दुसरा विजय मिळवला. या विजयासह लखनौचा संघ चार गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आला आहे.तर,बंगळुरूचा नवव्या स्थानावर आहे.
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (डब्ल्यू), मयंक डागर, रीस टोपले, मोहम्मद सिराज, यश दयाल.
क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), केएल राहुल (क), देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव