मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs KKR Dream 11 Prediction : आज तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये या ऑलराऊंडरला कॅप्टन बनवा, मालामाल व्हाल

RCB vs KKR Dream 11 Prediction : आज तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये या ऑलराऊंडरला कॅप्टन बनवा, मालामाल व्हाल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 29, 2024 11:23 AM IST

rcb vs kkr playing 11 prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज आरसीबी आणि केकेआर आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.

rcb vs kkr playing 11 prediction
rcb vs kkr playing 11 prediction

rcb vs kkr dream 11 prediction : आयपीएल २०२४ चा १०वा सामना आज (२९ मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगंळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने येतील. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा हा तिसरा सामना आहे आणि केकेआरने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे. 

केकेआरने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ४ धावांनी पराभव केला होता. तर आरसीबीने त्यांचा पहिला सामना सीएसकेविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात त्यांना पराभव सहन करावाला लागला होता. पण त्यानंतर त्यांनी दुसऱ्या सामन्यात पंजाबचा पराभव केला.

आरसीबी असो की केकेआर , दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match taam prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल. पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जर तुम्हाला आयपीएलदरम्यान फँटसी क्रिकेट खेळण्याची आवड असेल तर तुम्ही आजच्या सामन्यासाठीचा संघ अशाप्रकारे बनवू शकता.

कर्णधार कोणाला बनवणार?

आंद्रे रसेल : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा उत्कृष्ट खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू असल्याने तो कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. याशिवाय गेल्या सामन्यात त्याने २५ चेंडूत ६४ धावांची शानदार खेळी केली होती. तसेच, त्याने दोन षटकात २५ धावा देऊन २ विकेट्सही घेतल्या होत्या. अशा परिस्थितीत तुम्ही त्याला तुमचा कर्णधार बनवू शकता.

विराट कोहली : विराट कोहलीचा फॉर्म पाहता त्याला कर्णधार बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो. मोसमाच्या सुरुवातीच्या सामन्यात त्याने २१ धावा केल्या, पण त्यानंतर पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ४९ चेंडूत ७७ धावा केल्या आणि १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला सामना जिंकण्यात मदत झाली. अशा स्थितीत तुम्ही त्याला उपकर्णधारही बनवू शकता.

यष्टिरक्षक: फिल सॉल्ट

फलंदाज: विराट कोहली (उपकर्णधार), फाफ डू प्लेसिस, रिंकू सिंग

अष्टपैलू: सुनील नरेन, ग्लेन मॅक्सवेल, आंद्रे रसेल (कर्णधार), कॅमेरून ग्रीन

गोलंदाज: मिचेल स्टार्क, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

आरसीबीचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टीरक्षक), मयंक डागर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, यश दयाल.

इम्पॅक्ट प्लेयर - महिपाल लोमरोर

केकेआरचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

इम्पॅक्ट प्लेयर - सुयश शर्मा

IPL_Entry_Point