मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB Vs KKR Highlights : किंग कोहलीवर भारी पडला व्यंकटेश अय्यर, आरसीबीचा लाजिरवाणा पराभव

RCB Vs KKR Highlights : किंग कोहलीवर भारी पडला व्यंकटेश अय्यर, आरसीबीचा लाजिरवाणा पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 29, 2024 11:02 PM IST

RCB Vs KKR IPL Scorecard : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा दहावा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला.

RCB Vs KKR Highlights : किंग कोहलीवर भारी पडला व्यंकटेश अय्यर, आरसीबीचा लाजिरवाणा पराभव
RCB Vs KKR Highlights : किंग कोहलीवर भारी पडला व्यंकटेश अय्यर, आरसीबीचा लाजिरवाणा पराभव (PTI)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा दहावा सामना आज (२९ मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. यानंतर आरसीबीने २० षटकात १८३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात . प्रत्युत्तरात केकेआरने सात गडी राखून विजय मिळवला.

१८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी आरसीबीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मयंक डागरने ही भागीदारी तोडली. नरेन २२ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. त्याने २१३.६३ च्या स्ट्राईक रेटने दोन चौकार आणि ५ षटकार मारले. त्याचवेळी फिलिप सॉल्टने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३० धावा काढल्या.

या सामन्यात व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. संघाला तिसरा धक्का व्यंकटेशच्या रूपाने बसला. २९ चेंडूत अर्धशतक झळकावून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यश दयालने या फलंदाजाला आपला बळी बनवले. त्याने कर्णधारासोबत ७५ धावांची भागीदारी केली. 

रिंकू सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि ५ धावा करून नाबाद राहिला. तर श्रेयस अय्यरने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

त्याने आरसीबीविरुद्ध २४ चेंडूंचा सामना केला आणि १६२.५० च्या स्ट्राइक रेटने ३९ धावा केल्या. आरसीबीकडून विजयकुमार वैशाक, मयंक डागर आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

आरसीबी वि. केकेआर क्रिकेट स्कोअर

केकेआरच्या १२ षटकात १३७ धावा

केकेआरच्या डावातील १२ षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. कोलकाताची धावसंख्या १३७/२ आहे. श्रेयस अय्यर १४ धावांवर तर व्यंकटेश अय्यर ३४ धावांवर खेळत आहे.

सुनील नरेन बाद

मयंक डागरने सातव्या षटकात केकेआरला पहिला धक्का दिला. मयंकने सुनील नरेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. नरेन २२ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि ५ षटकार आले.

केकेआरने पॉवरप्लेमध्ये ठोकल्या ८५ धावा

पॉवरप्लेमध्ये कोलकाताने बिनबाद ८५ धावा केल्या आहेत. सुनील नरेन २० चेंडूत ४७ धावांवर खेळत आहे. आतापर्यंत त्याने २ चौकार आणि ५ षटकार मारले आहेत. तर फिल सॉल्ट १६ चेंडूत २८ धावांवर खेळत आहे. त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि २ षटकार आले.

आरसीबीच्या १८३ धावा

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमावून १८२ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ८३ नाबाद धावांची स्फोटक खेळी खेळली.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही आणि १७ धावांवर कर्णधार फाफ डू प्लेसिसची (८) विकेट गमावली. यानंतर विराट कोहली आणि कॅमेरून ग्रीन यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली.

पण आंद्रे रसेलने ग्रीनला बोल्ड करत ही भागीदारी संपुष्टात आणली. ग्रीनने ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. ग्रीन बाद झाल्यानंतर काही वेळातच कोहलीने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

शेवटी दिनेश कार्तिकही बरसला. कार्तिकने अवघ्या ८ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २० धावा केल्या. केकेआरचा मिचेल स्टार्क पुन्हा एकदा चांगलाच महागात पडला. स्टार्कने चार षटकात एकही विकेट न घेता ४७ धावा दिल्या.

पाटीदार पुन्हा फ्लॉप

रजत पाटीदार पुन्हा एकदा फ्लॉप झाला. १७व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रसेलने त्याला आपला बळी बनवले. त्याला केवळ ३ धावा करता आल्या. १७ षटकांनंतर संघाची धावसंख्या १४८/४ आहे.

विराट कोहलीचं अर्धशतक

विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ३६ चेंडूत ५० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि ३ षटकार आले. याशिवाय त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आरसीबीसाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत २४० षटकार मारले आहेत.

कॅमेरून ग्रीन बोल्ड

आंद्रे रसेलने ८२ धावांवर आरसीबीला दुसरा धक्का दिला. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने कॅमेरून ग्रीनला बोल्ड केले. त्याला २१ चेंडूत ३३ धावा करता आल्या. आता कोहली (४२) आणि अनुज रावत क्रीजवर आहेत.

पॉवरप्लेमध्ये ६१ धावा

आरसीबीने पॉवरप्लेमध्ये १ बाद ६१ धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि कॅमेरून ग्रीन जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. दोघांमध्ये २४ चेंडूत ४४ धावांची नाबाद भागीदारी आहे. तत्पूर्वी, फाफ डुप्लेसिस ८ धावा करून बाद झाला.

आरसीबीची फलंदाजी सुरू

विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस फलंदाजीसाठी क्रीजवर पोहोचले आहेत. दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. गेल्या सामन्यात या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

इम्पॅक्ट सब: महिपाल लोमरोर, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, विजयकुमार वैशाक, स्वप्नील सिंग.

कोलकाता नाइट रायडर्स : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

इम्पॅक्ट सब: सुयश शर्मा, वैभव अरोरा, मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रहमानउल्ला गुरबाज.

कोलकाताने गोलंदाजी निवडली

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत आरसीबी प्रथम फलंदाजी करताना दिसेल. या सामन्यात केकेआरने एक बदल करत फिरकी गोलंदाज अनुकुल रॉयचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. तर आरसीबीच्या संघात कोणताच बदल नाही.

आरसीबी-केकेआर हेड टू हेड 

केकेआरचा आरसीबीवर वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ३२ सामने खेळले गेले आहेत. यापैकी केकेआरने १८ तर आरसीबीने १४ सामने जिंकले आहेत. RCB ने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) झालेल्या पराभवाने या मोसमाची सुरुवात केली, तर एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील दुसऱ्या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जचा पराभव केला. दुसरीकडे पहिल्या सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला.

IPL_Entry_Point