IPL 2024: आयपीएलच्या दहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघाने आपपल्या मागील सामन्यात विजय मिळवला आहे. कोलकाताने त्यांच्या मागच्या सामन्यात हैदराबादवर विजय मिळवला होता. तर, बंगळुरूने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघाला पराभवाची धुळ चारली होती. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत कोलकाता दोन गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, बंगळुरू दोन गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना आज (२९ मार्च २०२४) खेळला जाणार आहे.हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्सवर लाइव्ह टेलिकास्ट केला जाईल. तर, जिओ सिनेमावर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग केले जाईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकिपर), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, महिपाल लोमरोड, सुयश प्रभू , कर्ण शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंह, लॉकी फर्ग्युसन, विल जॅक्स, मनोज भंडागे, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशू शर्मा, टॉम करन, रीस टोप्ले.
कोलकाता नाइट रायडर्स संघ: फिलिप सॉल्ट (विकेटकिपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, रमणदीप सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा, मनीष पांडे, वैभव अरोरा, अंगक्रिश रघुवंशी, रहमानउल्ला गुरबाज, चेतन साकारिया, शेरफेन रदरफोर्ड, साकिब हुसेन, अनुकुल रॉय, श्रीकर भारत, दुष्मंथा चमीरा.
संबंधित बातम्या