KKR vs RCB Weather : केकेआर-आरसीबी सामना होणार का? आज असेल कोलकात्याचं हवामान, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs RCB Weather : केकेआर-आरसीबी सामना होणार का? आज असेल कोलकात्याचं हवामान, पाहा

KKR vs RCB Weather : केकेआर-आरसीबी सामना होणार का? आज असेल कोलकात्याचं हवामान, पाहा

Published Mar 22, 2025 10:48 AM IST

RCB vs KKR Eden Gardens Weather : कोलकात्यात सध्या हवामान खराब आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार शनिवारी संध्याकाळी पाऊस पडू शकतो. अतिवृष्टी झाल्यास सामना रद्दही होऊ शकतो. पावसामुळे खेळाडूंच्या सरावावरही परिणाम झाला आहे.

KKR vs RCB Weather : केकेआर-आरसीबी सामना होणार का? आज असेल कोलकात्याचं हवामान, पाहा
KKR vs RCB Weather : केकेआर-आरसीबी सामना होणार का? आज असेल कोलकात्याचं हवामान, पाहा (Hindustan Times)

Kolkata Weather, RCB vs KKR IPL 2025 : आयपीएल २०२५ चा थरार आज (२२ मार्च) शनिवारपासून रंगणार आहे. आयपीएल १८ च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येणार आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे कोलकात्यात सध्या हवामान खराब आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार शनिवारी संध्याकाळी पाऊस पडू शकतो. अतिवृष्टी झाल्यास सामना रद्दही होऊ शकतो. पावसामुळे खेळाडूंच्या सरावावरही परिणाम झाला आहे.

कोलकात्यात शनिवारी संध्याकाळी आणि रात्री आकाश ढगाळ राहू शकते. यासोबतच पावसाचीही शक्यता आहे. Accu Weather च्या अहवालानुसार, सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर आकाशात हलके ढग येऊ शकतात.

ही स्थिती सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत राहील. ६ वाजता पाऊस झाल्यास उद्घाटन सोहळ्यावर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत आयपीएलचा पहिला सामना अडचणीत सापडला आहे.

कोलकात्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला

कोलकात्यात शुक्रवारी (२१ मार्च) संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे मैदान झाकले होते. इडन गार्डन्सचे संपूर्ण कर्मचारी मैदान सुरक्षित ठेवण्यात व्यस्त होते. आता शनिवारचे हवामानही खेळाडूंसाठी अडचणीचे ठरू शकते. पाऊस पडल्यास चाहत्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोलकाता आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी संध्याकाळी ६ वाजता उद्घाटन समारंभ आयोजित केला जाणार आहे.

केकेआर-आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा/रसिक दार सलाम.

कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नरेन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या