RCB Vs GG WPL : आरसीबीचा सलग दुसरा विजय, गुजरातचा ७ विकेट्सनी धुव्वा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB Vs GG WPL : आरसीबीचा सलग दुसरा विजय, गुजरातचा ७ विकेट्सनी धुव्वा

RCB Vs GG WPL : आरसीबीचा सलग दुसरा विजय, गुजरातचा ७ विकेट्सनी धुव्वा

Updated Feb 27, 2024 10:36 PM IST

RCB Vs GG WPL 2024 Highlights : आरसीबीने मोसमातील सलग दुसरा विजय मिळवला. यापूर्वी आरसीबीने यूपी वॉरियर्सचा पराभव केला होता. या विजयासह आरसीबीचे दोन सामन्यांतून ४ गुण झाले आहेत.

RCB Vs GG WPL 2024 Highlights
RCB Vs GG WPL 2024 Highlights (PTI)

Royal Challengers Bangalore vs Gujarat Giants WPL 2024 : महिला प्रीमियर लीगच्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुजरात जायंट्सचा ८ विकेट्सनी पराभव केला. मंगळवारी (२७ फेब्रुवारी) बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

यानंतर गुजरात जायंट्सने २० षटकांत ७ विकेट गमावत १०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १२.३ षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात ११० धावा करून सामना जिंकला.

अशाप्रकारे आरसीबीने मोसमातील सलग दुसरा विजय मिळवला. यापूर्वी आरसीबीने यूपी वॉरियर्सचा पराभव केला होता. या विजयासह आरसीबीचे दोन सामन्यांतून ४ गुण झाले आहेत. त्याचवेळी गुजरातला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

आरसीबीकडून कर्णधार स्मृती मानधनाने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तिने २७ चेंडूंचा सामना करताना २७ चौकार मारले. मानधनाच्या डावात एका षटकाराचाही समावेश होता. सबिनेनी मेघनाने २८ चेंडूत ३६ धावा करून नाबाद राहिली. तिने ५ चौकार आणि एक षटकार मारला. 

एलिस पेरीने १४ चेंडूत नाबाद २३ धावा केल्या. तिने ४ चौकार मारले. सोफी डिव्हाईन ६ धावा करून बाद झाली. ॲश्ले गार्डनर आणि तनुजा कंवर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

गुजरातचा डाव

तत्पूर्वी, गुजरातच्या फलंदाजांनी अतिशय वाईट फलंदाजी केली. त्यांच्याकडून दयालन हेमलताने सर्वाधिक नाबाद ३१ धावा केल्या. तर हरलीन देओलने २२ धावांचे योगदान केले. स्नेह राणाने १२ धावा केल्या. या तिघींशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. वेदा कृष्णमूर्ती ९ धावा करून बाद झाली. कर्णधार बेथ मुनीने ८, ऍशले गार्डनरने ७ धावा, फोबी लिचफिल्डने ५ धावा केल्या.

आरसीबीकडून सोफी मोलिनक्सने सर्वाधिक ३ बळी घेतले. रेणुका सिंह ठाकूर यांना दोन विकेट मिळाले. जॉर्जिया वेरहॅमने एक विकेट घेतली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या