रवींद्र जडेजाची पत्रकार परिषद वादात, ऑस्ट्रेलियन मीडियाला इंग्रजीत उत्तरं देण्यास नकार, हिंदीतच बोलत राहिला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  रवींद्र जडेजाची पत्रकार परिषद वादात, ऑस्ट्रेलियन मीडियाला इंग्रजीत उत्तरं देण्यास नकार, हिंदीतच बोलत राहिला

रवींद्र जडेजाची पत्रकार परिषद वादात, ऑस्ट्रेलियन मीडियाला इंग्रजीत उत्तरं देण्यास नकार, हिंदीतच बोलत राहिला

Dec 22, 2024 10:44 AM IST

Ravindra Jadeja Press Conference : रवींद्र जडेजाने शनिवारी मेलबर्नमधील प्रशिक्षण सत्रानंतर पत्रकार परिषद घेतली. येथे जडेजाने हिंदीत उत्तरं दिली. ऑस्ट्रेलियाच्या चॅनल ७ नुसार, जडेजाने इंग्रजीमध्ये प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला.

जडेजाची पत्रकार परिषद वादात, ऑस्ट्रेलियन मीडियाला इंग्रजीत उत्तरं दिली नाही, हिंदीतच बोलत राहिला
जडेजाची पत्रकार परिषद वादात, ऑस्ट्रेलियन मीडियाला इंग्रजीत उत्तरं दिली नाही, हिंदीतच बोलत राहिला (BCCI-X)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा त्याच्या पत्रकार परिषदेमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. या पत्रकार परिषदेत जडेजाने ऑस्ट्रेलियन मीडियाला इंग्रजीत नव्हे तर हिंदीत उत्तरे दिली. सोबतच यानंतर बस पकडायची आहे, असे सांगून त्याने पत्रकार परिषदही लवकर संपवली.

ऑस्ट्रेलियन मीडिया आता जडेजाच्या या पत्रकार परिषदेवर टीका करत असून त्याचे वागणे विचित्र होते, असे सांगत आहे. अवघ्या २ दिवसांपूर्वी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन पत्रकाराला फॅमिली फोटो काढल्याबद्दल फटकारले होते.

जडेजाच्या पत्रकार परिषदेनंतर ऑस्ट्रेलियन मीडिया त्याच्यावर टीका करत आहे. चॅनल-७ ने याला अजब पत्रकार परिषद म्हटले.

पत्रकार परिषद भारतीय माध्यमांसाठी होती

रवींद्र जडेजाने शनिवारी मेलबर्नमधील प्रशिक्षण सत्रानंतर पत्रकार परिषद घेतली. येथे जडेजाने हिंदीत उत्तरं दिली. ऑस्ट्रेलियाच्या चॅनल ७ नुसार, जडेजाने इंग्रजीमध्ये प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला.

भारताच्या मीडिया टीमने त्याच पत्रकारांकडे लक्ष दिले ज्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी होती. काही ऑस्ट्रेलियन पत्रकारही तिथे होते. पण जडेजाने फक्त हिंदीत उत्तर दिले. यानंतर जड्डूने पत्रकारांना बस पकडायची असल्याचे सांगितले आणि पत्रकार परिषद संपली. भारताच्या मीडिया टीमने सांगितले की, ही परिषद केवळ प्रवासी भारतीय मीडियासाठी होती.

विराट आणि महिला पत्रकाराचा वाद

यापूर्वी १९ डिसेंबर रोजी मेलबर्न विमानतळावर चॅनल ७ च्या महिला पत्रकारावर विराट कोहली चिडला होता. तो मीडियाला कुटुंबाचे फोटो काढू नका असे सांगत होता, पण चॅनल ७ च्या पत्रकाराने ते फोटो काढले. कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसह (वामिका आणि अकाय) मेलबर्न विमानतळावर पोहोचला होता.

यावेळी ऑस्ट्रेलियन वाहिनी 'चॅनल-७' च्या पत्रकाराने त्याचा व्हिडिओ बनवला. विराटने महिला पत्रकाराला आपली छायाचित्रे चालवण्याची विनंती केली परंतु आपल्या कुटुंबाची छायाचित्रे डिलीट करण्यात सांगितले, मात्र पत्रकाराने कोहलीचे ऐकले नाही. यावर ऑस्ट्रेलियन मीडियाने सांगितले की, विमानतळ सार्वजनिक मालमत्ता आहे, जिथे फोटो काढता येतात.

Whats_app_banner