मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  वडिलांच्या आरोपांना जडेजाचं प्रत्युत्तर? पत्नी रिवाबाला समर्पित केला 'सामना'वीराचा पुरस्कार

वडिलांच्या आरोपांना जडेजाचं प्रत्युत्तर? पत्नी रिवाबाला समर्पित केला 'सामना'वीराचा पुरस्कार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 19, 2024 02:30 PM IST

Ravindra Jadeja Player Of The Match Award : हैदराबादमधील पहिली कसोटी हरल्यानंतर भारताने मालिकेत शानदार पुनरागमन केले. विशाखापट्टणमनंतर आता टीम इंडियाने राजकोट कसोटीतही बॅझबॉलची हवा काढली. यानंतर टीम इंडिया या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.

Ravindra Jadeja Player Of The Match Award
Ravindra Jadeja Player Of The Match Award

टीम इंडियाने राजकोट कसोटीतही बॅझबॉलची हवा काढली आहे. भारताने राजकोट कसोटीत इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ १२२ धावांत गारद झाला.

हैदराबादमधील पहिली कसोटी हरल्यानंतर भारताने मालिकेत शानदार पुनरागमन केले. विशाखापट्टणमनंतर आता टीम इंडियाने राजकोट कसोटीतही बॅझबॉलची हवा काढली. यानंतर टीम इंडिया या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे.

'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार रिवाबाला समर्पित

राजकोट कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजा याला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले. जडेजाने या सामन्याच्या पहिल्या डावात महत्वपूर्ण ११२ धावा केल्या. तसेच गोलंदाजीत दोन्ही डावात ७ बळी घेतले. दुसऱ्या डावात जडेजाने ५ विकेट्स घेतल्या.

दरम्यान, जडेजाने त्याचा 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार त्याची पत्नी रिवाबाला समर्पित केला. विशेष म्हणजे,काही दिवसांपूर्वीच जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह यांनी रिवाबावर पिता-पुत्रामध्ये फुट पाडल्याचे गंभीर आरोप केले होते. 

रविंद्र जडेजा काय म्हणाला?

सामना संपल्यानंतर जडेजा म्हणाला की, "दुसऱ्या डावात ५ बळी घेणे ही एक खास भावना आहे. तसेच, कसोटीत शतक आणि ५ विकेट घेणे देखील विशेष आहे." जड्डूने या पुरस्काराबद्दल पुढे सांगितले की, “माझ्या होम ग्राऊंडवरील हा सामना खास होता. मी हा पुरस्कार माझ्या पत्नीला समर्पित करू इच्छितो. पडद्यामागे ती मानसिकदृष्ट्या मला खूप सपोर्ट करत असते. ती मला नेहमीच आत्मविश्वास देते.”

जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह यांनी एका वर्तमनापत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या सुनेने जडेजावर जादूटोणा आहे. ते सुन आणि मुलगा यांच्यापासून वेगळे राहतात. रविंद्र जडेजा आणि रिवाबाच्या लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच वाद सुरू झाले'.  मात्र, रविंद्र जडेजाने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांचे हे गंभीर आरोप फेटाळून लावले होते.

IPL_Entry_Point