
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, जडेजा त्याच्या खेळामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. हे एक कौटुंबिक कारण असून जड्डूच्या वडिलांनी एक धक्कादायक विधान केले आहे. यानंतर आता जडेजाच्या या वक्तव्याची मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आता रविंद्र जडेजाने स्वतः सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत प्रकरणाचे संपूर्ण सत्य सांगितले आहे.
रवींद्र जडेजाने गुजराती भाषेत ट्विट करत लिहिले की, ‘मुलाखतीमध्ये जे काही बोलले जात आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे, त्याचा काहीही अर्थ नाही. माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही. माझी प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. मलाही खूप काही सांगायचे आहे, पण वेळ आल्यावर मी माझे मत मांडेन’.
रवींद्र जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत जड्डूचे वडील सांगत आहेत की,
'मी तुम्हाला खरे सांगतो, माझा रवी किंवा त्याची पत्नी रिवाबा यांच्याशी कोणताही संबंध नाही. आम्ही त्यांना कॉल करत नाही आणि ते आम्हाला कॉल करत नाहीत. रवीच्या लग्नानंतर दोन-तीन महिन्यांनीच वाद होऊ लागले. सध्या मी जामनगरमध्ये एकटाच राहतो, रवींद्र वेगळा राहतो. बायकोने त्याच्यावर काय जादू केली आहे माहीत नाही. मला एक मुलगा आहे, माझे हृदय जळून राख झाले आहे. त्याचे आणि रिवाबाचे लग्न केले नसते तर बरे झाले असते. त्याला क्रिकेटर बनवले नसते तर बरे झाले असते. आमची ही अवस्था झाली नसती.
सुत्रांच्या माहितीनुसार, रविंद्र जडेजाचे वडिल हे जड्डू सून रिवाबाशी बोलत नाही. त्यांच्यात आता कोणतेही संबंध नाहीत. पाच वर्षांपासून त्यांनी त्यांच्या नातवाचा चेहराही पाहिलेला नाही.
संबंधित बातम्या
