R Ashwin : आर अश्विनचा चेपॉकवर मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा सर्वात म्हातारा खेळाडू-ravichandran ashwin the oldest to take five wickets haul for india in test history ind vs ban 1st test highlights ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  R Ashwin : आर अश्विनचा चेपॉकवर मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा सर्वात म्हातारा खेळाडू

R Ashwin : आर अश्विनचा चेपॉकवर मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा सर्वात म्हातारा खेळाडू

Sep 22, 2024 12:10 PM IST

Oldest To Take Five Wickets Haul For India : अश्विनने ३८व्या वर्षी कसोटीच्या एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

R Ashwin : आर अश्विनचा चेपॉकवर मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा सर्वात म्हातारा खेळाडू
R Ashwin : आर अश्विनचा चेपॉकवर मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा सर्वात म्हातारा खेळाडू (AFP)

IND vs BAN 1st Test Highlights :  चेन्नई कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २८० धावांनी शानदार विजय नोंदवला. दुसऱ्या डावात भारतासाठी रवीचंद्रन अश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अश्विनने २१ षटकात ८८ धावा देत ६ बळी घेतले. अशाप्रकारे अश्विन कसोटी सामन्यात भारताकडून ५ बळी घेणारा सर्वात वयस्कर गोलंदाज ठरला आहे.

अश्विनने ३८व्या वर्षी कसोटीच्या एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. 

अश्विनने शतकासोबत ५ विकेट घेतले

अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावले होते. तर बांगलादेशच्या दुसऱ्या डावात रवी अश्विनने ६ विकेट घेतल्या. वास्तविक, रवी अश्विनने कसोटीत शतक झळकावण्यासोबतच ५ विकेट घेण्याची ही चौथी वेळ आहे. एकाच कसोटीत शतक आणि ५ विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

इयान बोथमने हा पराक्रम ५ वेळा नोंदवला आहे. तर वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज गॅरी सोबर्स, पाकिस्तानचा मुश्ताक मोहम्मद, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि भारताचा रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोनदा हा पराक्रम केला आहे.

रवी अश्विनने पहिल्या डावात १३३ चेंडूत ११३ धावांची शानदार खेळी खेळली होती. या खेळीत त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले. बांगलादेशच्या पहिल्या डावात अश्विनला विकेट घेण्यात अपयश आले. मात्र या ऑफस्पिनरने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात आर अश्विनने ६ विकेट घेतल्या.

भारत-बांगलादेश सामन्यात काय घडलं?

तत्पूर्वी या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने सर्वबाद ३७६ धावा केल्या. आर अश्विनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि १३३ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११३ धावा केल्या.

त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला भारतीय गोलंदाजांनी ४७.१ षटकांत १४९ धावांत गुंडाळले. या डावात जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक ४ बळी घेतले.

यानंतर टीम इंडिया दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरली आणि ४ बाद २८७ धावा करून डाव घोषित केला. यादरम्यान शुभमन गिलने १७६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११९ धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने १२८ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. डाव घोषित केल्यानंतर भारतीय संघाने बांगलादेशला ५१५ धावांचे लक्ष्य दिले.

भारताने सामना २८० धावांनी जिंकला

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशच्या सलामीवीरांना चांगली सुरुवात केली होती. पण त्यांची मधली फळी अपयशी ठरली. अशा स्थितीत भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला १३४ धावांवर ऑल आऊट केले. या डावात रविचंद्रन अश्विनने ६ विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना २८० धावांनी जिंकला.

Whats_app_banner