आयपीएलचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आगामी हंगामापूर्वी कर्णधार फाफ डु प्लेसिस याला रिलीज केले होते. सोबत नवीन कर्णधाराचे नावही जाहीर केलेले नाही, त्यामुळे संघाचे नेतृत्व कोण करणार याबाबत संभ्रम आहे.
मात्र, भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला वाटते की, आयपीएल २०२५ मध्ये विराट कोहली आरसीबीचा कर्णधार असेल. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाविषयी बोलताना अश्विन म्हणाला की, त्याच्याकडे नेतृत्वासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स यानेही विराट कोहली पुढील वर्षी फ्रँचायझीचे नेतृत्व करेल असे भाकीत केले होते.
विराट कोहलीने २०२१ नंतर आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले आहे की, विराट कोहली संघाचे नेतृत्व करेल. मला असेच वाटते कारण ते कॅप्टनसाठी गेले नाहीत. अशा स्थितीत कर्णधार म्हणून विराट कोहलीशिवाय दुसरा कोणी दिसत नाही.
अश्विनने लिलावादरम्यान आरसीबीचे कौतुक केले होते. त्यांनी खूप विचारपूर्वक खेळाडू खरेदी केल्याचे अश्विनने सांगितले. जेद्दाह येथे झालेल्या मेगा लिलावात आरसीबीने टिम डेव्हिड, जोश हेजलवूड, फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंना खरेदी केले.
"मला वाटते की त्यांचा लिलाव चांगला झाला. अनेक संघांनी आपल्या पर्समध्ये कोट्यवधी रुपये आणले होते. ते वेगाने खर्च करत होते पण आरसीबीने भरपूर पैसे असूनही वाट पाहिली. ज्यांची गरज आहे, अशाच खेळाडूंवर त्यांनी बोली लावली. असेही अश्विनने सांगितले.
आयपीएल २०२५ साठी आरसीबीचा संपूर्ण संघ- विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडगे, जॅकोब, जॉब, रास बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक छिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.