भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याने नुकतीच इंडिगो एअरलाइन्सविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करताना अश्विनने आरोप केला की इंडिगो एअरलाइन्स प्रवाशांनी आधी बुक केलेल्या सीटकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे.
अश्विनने आपला अनुभव "फसवणूक करणारा" असल्याचे सांगून एअरलाइनवर टीका केली.
अश्विनने ट्विटरवर लिहिले, "ही समस्या आता इंडिगो एअरलाइन्समध्ये सामान्य होत चालली आहे. माझा अलीकडचा अनुभव खूपच वाईट होता. थर्ड पार्टी बुकिंग प्लॅटफॉर्मवरून बुकिंग केल्यानंतर, एअरलाइनने माझी बुक केलेली सीट दुसऱ्याला दिली. हा घोटाळा आहे की नाही हे माहित नाही. पण त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, तुम्ही पैसे दिले तरी तुम्हाला तुमची बुक केलेली सीट मिळणार नाही.
अश्विनची ही तक्रार अशा वेळी आली आहे जेव्हा प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाइन्सवर टीका केली होती. एक प्रसंग सांगताना, भोगले यांनी सांगितले होते, एका वृद्ध जोडप्याने त्यांना जास्त चालावे लागू नये म्हणून त्यांची सीट चौथ्या रांगेत जागा बुक केली होती, मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता एअरलाईन्सने त्यांची जागा १९व्या रांगेत बदलली. या बदलामुळे वृद्ध व्यक्तीला अरुंद कॉरिडॉरमधून चालताना खूप त्रास झाला.
अश्विनने आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत ५०० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. तसेच, त्याने कसोटीत ४ शतकांसह गोलंदाजी अष्टपैलू म्हणून नाव कमावले आहे. त्याला २०१४ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आणि २०१२-१३ हंगामासाठी BCCI चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ऑफ द ठरला. डिसेंबर २०१६ मध्ये त्याने ICC क्रिकेटर ऑफ द इयर २०१६ सोबत ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर २०१६ देखील जिंकला.