भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी टीम इंडियाने २८० धावांनी जिंकली. या सामन्याचा निकाल चौथ्या दिवशीच लागला. भारताच्या ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा लंचपूर्वी संघ २३४ धावांवर गडगडला.
भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या. तर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांवर गारद झाला.
आर अश्विन भारताच्या विजयाचा हिरो ठरला, त्याने बांगलादेशच्या दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या आणि या सामन्याच्या पहिल्या दमदार फलंदाजी करत शतकही झळकावले.
रविचंद्रन अश्विनने बॉल आणि बॅट दोन्हीसह चमकदार कामगिरी करत अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आणि दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले. या सामन्यात अश्विनने टीम इंडियाच्या पहिल्या डावात शतकी खेळीसह ११३ धावा केल्या, तर गोलंदाजीत त्याने चौथ्या डावात एकूण ६ विकेट्स घेतल्या.
अश्विनला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला, यासोबतच अश्विनने महान भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर याला एका खास बाबीत मागे टाकले.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात अश्विनने सामनावीराचा पुरस्कार पटकावताच, तो सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार मिळून भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा खेळाडू बनला. या बाबतीत त्याने कसोटीत एकूण १९ वेळा हा पुरस्कार पटकावणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत १० सामनावीर आणि १० मालिकावीर पुरस्कार पटकावले आहेत, तर सचिनने कसोटीत १४ सामनावीर आणि ५ मालिकावीर पुरस्कार जिंकले आहेत. अशा स्थितीत अश्विनच्या नावावर असलेल्या या दोन्ही पुरस्कारांची एकूण संख्या २० झाली आहे.
रविचंद्रन अश्विन - २० (१० मॅन ऑफ द मॅच + १० प्लेअर ऑफ द सिरीज)
सचिन तेंडुलकर - १९ (१४ मॅन ऑफ द मॅच + ५ प्लेअर ऑफ द सिरीज)
राहुल द्रविड - १५ (११ सामनावीर + ४ प्लेअर ऑफ द सिरीज)
अनिल कुंबळे - १४ (१० मॅन ऑफ द मॅच + ४ प्लेअर ऑफ द सिरीज)
वीरेंद्र सेहवाग - १३ (८ मॅन ऑफ द मॅच प्लस ५ प्लेअर ऑफ द सिरीज)
विराट कोहली - १३ (१० मॅन ऑफ द मॅच + प्लेअर ऑफ द सिरीज)