भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी टीम इंडियाने २८० धावांनी जिंकली. या सामन्याचा निकाल चौथ्या दिवशीच लागला. लंचपूर्वी बांगलादेशचा संघ २३४ धावांवर गडगडला.
आर अश्विन भारताच्या विजयाचा हिरो ठरला, त्याने दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या आणि या सामन्याच्या पहिल्या दमदार फलंदाजी करत शतकही झळकावले.
अश्विनचे शतक (११३) आणि रवींद्र जडेजाच्या (८६) धावांच्या बळावर भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात अवघ्या १४९ धावांत सर्वबाद झाला.
भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावात १४९ धावांची आघाडी मिळाली.
यानंतर दुसऱ्या डावात भारताने ४ बाद २८७ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर बांगलादेशला ५१५ धावांचे लक्ष्य मिळाले, ज्याचा पाठलाग करण्यात बांगलादेशचा संघ अपयशी ठरला आणि चौथ्या दिवशी २३४ धावांवर सर्वबाद झाला.
दरम्यान, या सामन्यात स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विन याने ऑस्ट्रेलियाचा महान माजी फिरकीपटू शेन वॉर्न याची बरोबरी केली. वॉर्नने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३७ वेळा एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या होत्या. वॉर्नने १४५ कसोटी सामन्यात १८ वर्षांपूर्वी ही कामगिरी केली होती.
आता अश्विनने या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने आपल्या १०१ व्या कसोटीत ऑस्ट्रेलियन फिरकीच्या जादूगाराची बरोबरी केली. याशिवाय अश्विनने न्यूझीलंडचा महान फलंदाज रिचर्ड हॅडलीला मागे टाकले, ज्याच्या नावावर ३६ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.
अश्विन आता श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या मागे आहे, ज्याने अव्वल स्थानावर अविश्वसनीयरित्या आघाडी कायम राखली आहे. मुरलीधरनच्या नावावर ६७ वेळा एका डावात ५ विकेट घेण्याचा विक्रम आहे. म्हणजेच, अश्विनला मुरलीचा विक्रम मोडण्यासाठी आणखी ३० वेळा ५ विकेट घ्याव्या लागणार आहेत.
मुथैया मुरलीधरन (श्रीलंका) - ६७
रविचंद्रन अश्विन (भारत)- ३७
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)- ३७
रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड) - ३६
अनिल कुंबळे (भारत)- ३५