Ashwin Century : अश्विनची चेपॉकवर बॅझबॉल स्टाईल बॅटिंग, ठोकलं कसोटी कारकिर्दीतील सर्वात जलद शतक-ravichandran ashwin century against bangladesh at chennai ind vs ban 1st test day 1 highlights scorecard ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ashwin Century : अश्विनची चेपॉकवर बॅझबॉल स्टाईल बॅटिंग, ठोकलं कसोटी कारकिर्दीतील सर्वात जलद शतक

Ashwin Century : अश्विनची चेपॉकवर बॅझबॉल स्टाईल बॅटिंग, ठोकलं कसोटी कारकिर्दीतील सर्वात जलद शतक

Sep 19, 2024 05:22 PM IST

R Ashwin Century : रविचंद्रन अश्विन याने टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करत चेन्नई कसोटीत शतक झळकावले. त्याने रवींद्र जडेजासोबत १९५ धावांची भागीदारीही केली.

Ashwin Century : अश्विनची चेपॉकवर बॅझबॉल स्टाईल बॅटिंग, ठोकलं कसोटी कारकिर्दीतील सर्वात जलद शतक
Ashwin Century : अश्विनची चेपॉकवर बॅझबॉल स्टाईल बॅटिंग, ठोकलं कसोटी कारकिर्दीतील सर्वात जलद शतक (AFP)

रविचंद्रन अश्विनने भारतासाठी दमदार कामगिरी करत चेन्नई कसोटीत शतक झळकावले आहे. अश्विनने बांगलादेशविरुद्ध अप्रतिम खेळी केली आहे. त्याने रवींद्र जडेजासोबत १८० हून अधिक धावांची भागीदारीही पूर्ण केली.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमूल हसन शांतो याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 

यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडिया अडचणीत सापडली होती, पण यानंतर रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी डाव सांभाळला आणि संघाला ३०० चा टप्पा पार करून दिला. अश्विनचे ​​कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे.

अश्विन भारताकडून आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तर जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. दमदार फलंदाजी करत अश्विनने कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. 

महत्त्वाची बाब म्हणजे हा सामना पाहण्यासाठी त्याचे वडीलही चेपॉक स्टेडियमवर पोहोचले आहेत. अश्विनने १०८ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले. अश्विनच्या कारकिर्दीतील हे सहावे कसोटी शतक आहे आणि त्याचे सर्वात वेगवान कसोटी शतक आहे.

जडेजा-अश्विनची मजबूत भागीदारी 

कसोटीचा पहिला दिवसअखेर टीम इंडियाने ८० षटकांत ६ विकेट गमावून ३३९ धावा केल्या होत्या. यादरम्यान जडेजा ११७ चेंडूत ८६ धावा करून नाबाद परतला. त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले. जड्डूने अश्विनसोबत १९५ धावांची भागीदारी केली. जडेजा आणि अश्विनच्या या भागीदारीने अनेक विक्रम मोडीत काढले.दोघांनी २२७ चेंडूंचा सामना केला.

अश्विन ११२ चेंडूत १०२ धावा करून नाबाद परतला. त्यानेही १० चौकार आणि २ षटकार मारले.

चेपॉकवर अश्विनचे ​​दुसरे शतक

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रविचंद्रन अश्विनने सलग दुसरे शतक झळकावले. या मैदानावर भारताने याआधी २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळली होती. अश्विनने त्या सामन्याच्या दुसऱ्या डावातही शतक झळकावले होते.

तमिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अश्विनचे चेपॉक हे होम ग्राउंड आहे. याच मैदानावर रविचंद्रन अश्विनने २००६ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

खराब सुरुवातीनंतर टीम इंडियाचे दमदार कमबॅक 

भारताची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा ६ धावा करून बाद झाला. शुभमन गिल शून्यावर बाद झाला. तर विराट कोहली केवळ ६ धावा तंबूत परतला. तर ऋषभ पंतने ५२ चेंडूत ३९ धावा केल्या. तर केएल राहुल १६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 

यशस्वी जैस्वालने अर्धशतक झळकावले. त्याने ११८ चेंडूंचा सामना करत ५६ धावा केल्या. यशस्वीने ९ चौकार मारले.

Whats_app_banner