मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KL Rahul : घाई करू नका, नाही तर केएल राहुलचा बुमराह होईल, माजी कोचचा निवडकर्त्यांना इशारा

KL Rahul : घाई करू नका, नाही तर केएल राहुलचा बुमराह होईल, माजी कोचचा निवडकर्त्यांना इशारा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 17, 2023 06:05 PM IST

asia cup 2023 : आशिया कप २०२३ पूर्वी रवी शास्त्री यांनी टीम इंडियाला केएल राहुलबद्दल इशारा दिला आहे. घाईमुळे नुकसान होऊ शकते असे शास्त्रींनी सांगितले आहे.

KL Rahulasia cup 2023
KL Rahulasia cup 2023

Ravi Shastri on KL Rahul : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आशिया चषक 2023 आधी भारतीय संघाला मोठा इशारा दिला आहे. शास्त्रींनी विकेटकीपर फलंदाज केएल राहुलबाबत मोठं वक्तव्य केले आहे. आशिया कपमधून केएल राहुलचे पुनरागमन अपेक्षित आहे. सध्या राहुल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. पण रवी शास्त्रींच्या मते, केएल राहुलला इतक्यात आशिया कपमध्ये खेळवणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

IPL 2023 मध्ये दुखापत झाल्यानंतर केएल राहुलच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तो बराच काळ क्रिकेट खेळला नाही. आता 'स्टार स्पोर्ट्स'वर बोलताना रवी शास्त्री म्हणाले, की "जेव्हा तुम्ही अशा खेळाडूबद्दल बोलत आहात जो बऱ्याच काळापासून खेळला नाही आणि दुखापतीतून सावरत आहे. आशिया चषकासाठी त्याचा प्लेइंग इलेव्हनसाठी विचार करणे हे थोडे घाईचे होईल.”

केएल राहुल हा आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला पसंतीचा यष्टिरक्षक आहे. संघात त्याची अनुपस्थिती भारतासाठी कठीण होऊ शकते. रवी शास्त्री राहुलबद्दल पुढे म्हणाले, “सोबत तुम्ही त्याचा विकेटकीपर फलंदाज म्हणून विचार करत आहात. त्याची आताच गुडघ्याची सर्जरी झाली आहे. सर्जरीनंतर गुडघ्याची हालचाल करणे कठीण काम असेल."

जसप्रीत बुमराहचे उदाहरण देताना रवी शास्त्री पुढे म्हणाले की, "संघात पुनगरागमन करण्यासाठी खेळाडूंची घाई करणे किती घातक ठरू शकते हे सांगितले. माजी प्रशिक्षक म्हणाले, “तुम्ही एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यानंतर घाई करू शकत नाही. तुम्ही जसप्रीत बुमराहसोबत हे एकदा नाही, दोनदा किंवा तीनदा केले आणि त्यानंतर तो १४ महिने बाहेर राहिला'.

राहुल आणि अय्यर ८० टक्के फिट 

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या आठवड्याच्या सुरुवातीला 'इनसाइडस्पोर्ट'ला सांगितले की, "आम्ही काही दुखापतींच्या अपडेटची वाट पाहत आहोत. राहुल आणि अय्यर ८० टक्के तंदुरुस्त आहेत पण मॅच फिट नाहीत. पुन्हा एकदा क्लिअर होईल, त्यानंतर भारतीय स्क्वॉड घोषित केले जाईल.

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर