IND vs PAK : उसे हवा में मत चढ़ाओ! रवी शास्त्रींनी लाईव्ह कॉमेंट्रीत शाहीन आफ्रिदीची लायकी काढली, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs PAK : उसे हवा में मत चढ़ाओ! रवी शास्त्रींनी लाईव्ह कॉमेंट्रीत शाहीन आफ्रिदीची लायकी काढली, पाहा

IND vs PAK : उसे हवा में मत चढ़ाओ! रवी शास्त्रींनी लाईव्ह कॉमेंट्रीत शाहीन आफ्रिदीची लायकी काढली, पाहा

Oct 15, 2023 02:14 PM IST

Ravi Shastri on Shaheen Afridi in Live Commentary : कॉमेंटेटर रवी शास्त्री यांनी पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलेच ट्रोल केले आहे. भारताविरुद्ध पाकिस्तानच्या खराब गोलंदाजीनंतर शास्त्रींनी शाहीन आफ्रिदीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

Ravi Shastri Trolled Shaheen Afridi
Ravi Shastri Trolled Shaheen Afridi

Ravi Shastri Trolled Shaheen Afridi in Live Commentary : क्रिकेट वर्ल्डकपचा सर्वात मोठा सामना शनिवारी (१४ ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा अवघ्या ३० षटकात धुव्वा उडवला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने सर्वच गोलंदाजांच्या गोलंदाजीवर षटकार लगावले.

या दरम्यान, भारतीय कॉमेंटेटर्सनी पाकिस्तानी गोलंदाजीची चांगलीच खिल्ली उडवली. टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर पाकिस्तानी गोलंदाज पूर्णपणे फिके दिसत होते. हिटमॅन रोहित शर्मासमोर सर्वच पाकिस्तानी गोलंदाज हतबल दिसत होते.

शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ, शादाब खान आणि मोहम्मद नवाज या सर्वांची धुलाई झाली होती. पाकिस्तानी गोलंदाजांची अशी निराशाजनक कामगिरीवर पाहून कॉमेंट्रीमध्ये रवी शास्त्री यांनीही पाकिस्तानी गोलंदाजांची खिल्ली उडवली . शास्त्रींनी लाइव्ह मॅचदरम्यान पाकिस्तानी गोलंदाजांबाबत मोठं वक्तव्य केले.

रवी शास्त्री यांनी केले पाकिस्तानी गोलंदाजांना ट्रोल

स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह कॉमेंट्री करताना रवी शास्त्री म्हणाले, 'जेव्हा नसीम शाह खेळत नाहीये. तेव्हा तुमच्या स्विंगची क्वालिटी अशी आहे. शाहीन शाह आफ्रिदी हा काही वसीम अक्रम नाही. तो नवीन चेंडूने गोलंदाजी करतो, तो विकेट घेऊ शकतो. तो चांगला गोलंदाज आहे. पण त्याला एवढी हवा देण्याची गरज नाही. जेव्हा तो ठीक ठाक गोलंदाज आहे तेव्हा त्याला ठीक ठाक आहे असे बोलले पाहिजे. उगाच तो काही तरी जबरदस्त करतोय, असे बोलून त्याला चढवून ठेवू नये. कारण तो जबरदस्त नाहीच आहे. हे आपण मानले पाहिजे".

भारताने सामना सहज जिंकला

भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप झाली. कर्णधार बाबर आझमशिवाय एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. अशा स्थितीत पाकिस्तान १९१ धावांवर ऑलआऊट झाला. रोहित शर्माच्या (८६) आणि श्रेयस अय्यरच्या (५३*) अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने १९२ धावांचे लक्ष्य केवळ ३ गड्यांच्या मोबदल्यात ३० षटकात पार केले.

 

Whats_app_banner