Rohit Sharma : गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत रवी शास्त्री यांचं मोठं वक्तव्य
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत रवी शास्त्री यांचं मोठं वक्तव्य

Rohit Sharma : गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत रवी शास्त्री यांचं मोठं वक्तव्य

Jan 02, 2025 03:38 PM IST

Ravi Shastri on Rohit Sharma Retirement : सिडनी टेस्टमध्ये रोहित शर्मा खेळणार की नाही हा सस्पेन्स कायम असतानाच रवी शास्त्री यांनी आता मोठं वक्तव्य केलं आहे.

गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत रवी शास्त्री यांचं मोठं वक्तव्य
गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत रवी शास्त्री यांचं मोठं वक्तव्य

Cricket India News in Marathi : भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'रोहित शर्मा यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यास मला आश्चर्य वाटणार नाही, असं शास्त्री यांनी म्हटलं आहे. 

सिडनी कसोटी रोहित शर्मा खेळेल का याबाबतचा सस्पेन्स गौतम गंभीर (Gautam Gambhir) यानं कायम ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर शास्त्री यांचं हे वक्तव्य आलं आहे. त्यामुळं त्याला महत्त्व आहे. रवी शास्त्री म्हणाले, 'रोहितला सिडनीतील फेअरवेल टेस्ट खेळण्याची संधी मिळाल्यास त्यानं कोणत्याही दबावाशिवाय खेळायला हवं, कारण बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकणं महत्त्वाचं आहे. सध्याची स्थिती बघता ही ट्रॉफी हातातून निसटण्याची शक्यता आहे, असं शास्त्री म्हणाले.

‘मी रोहित शर्माच्या आजूबाजूला असतो तर त्याला सांगितलं असतं की जा आणि धमाका कर. सध्या तो ज्या पद्धतीनं खेळत आहे, ते फारसा प्रभावी वाटत नाही, असं शास्त्री यांनी आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये बोलताना सांगितलं. 'रोहितनं प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला पाहिजे आणि मग बघायचं काय होतं ते, असं शास्त्री म्हणाले.

तो निवृत्त झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही!

'रोहित त्याच्या करिअरचा निर्णय घ्यायला सक्षम आहे, पण तो निवृत्त झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही, कारण आता वय त्याच्या बाजूनं राहिलेलं नाही. शुभमन गिलसारखे युवा खेळाडू वाट पाहत आहेत. २०२४ मध्ये त्याची सरासरी ४० आहे. त्या गुणवत्तेचा खेळाडू बाहेर असणं हे चांगलं दिसत नाही. भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला तर गोष्ट वेगळी आहे. नाहीतर रोहितसाठी चमकदार कामगिरी करून दाखवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं.

'भारतानं एक दशकापासून बीजीटी ट्रॉफी गमावलेली नाही, परंतु या मालिकेत टीम इंडिया १-२ नं पिछाडीवर आहे. जर टीम इंडिया सिडनीमध्ये जिंकली तर मालिका २-२ अशी बरोबरीत राहील आणि ट्रॉफी भारताकडं राहील.

काय म्हणाला गौतम गंभीर?

सिडनी कसोटीत रोहित शर्मा खेळेल का असा प्रश्न गौतम गंभीरला विचारण्यात आला होता. त्यावर, नाणेफेकीच्या वेळी खेळपट्टी पाहून प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेतला जाईल, असं संदिग्ध उत्तर गौतम गंभीर यानं दिलं.

Whats_app_banner