मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs RR : आर अश्विननं वानखेडेवर रचला इतिहास, धोनी-विराटच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

MI vs RR : आर अश्विननं वानखेडेवर रचला इतिहास, धोनी-विराटच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

Apr 01, 2024 08:57 PM IST

R Ashwin MI vs RR : आर अश्विन त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. अशी कामगिरी करणारा अश्विन या लीगमधील १० वा क्रिकेटपटू ठरला आहे. या ऑफस्पिनरने २००९ मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केले होते.

R Ashwin 200th IPL Match आर अश्विननं वानखेडेवर रचला इतिहास, धोनी-विराटच्या खास क्लबमध्ये एन्ट्री
R Ashwin 200th IPL Match आर अश्विननं वानखेडेवर रचला इतिहास, धोनी-विराटच्या खास क्लबमध्ये एन्ट्री (AFP)

R Ashwin 200th IPL Match : आयपीएल २०२४ च्या १४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे. मुंबई इंडियन्स यंदा पहिल्यांदाच त्यांच्या होम ग्राऊंडवर खेळत आहे. या साममन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, हा सामना खेळण्यासाठी मैदानावर पाऊल टाकताच रविचंद्रन अश्विनने एक विक्रम आपल्या नावे केला आहे.

वास्तविक, आर अश्विन त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. अशी कामगिरी करणारा अश्विन या लीगमधील १० वा क्रिकेटपटू ठरला आहे. या ऑफस्पिनरने २००९ मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केले होते. 

आतापर्यंत खेळलेल्या १९९ सामन्यांमध्ये अश्विनने १७२ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर अश्विनने बॅटनेही आपला प्रभाव दाखवला असून त्याने ७४३ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन पाचव्या स्थानावर आहे.

एमएस धोनीचे नाव आघाडीवर 

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. माहीने या लीगमध्ये आतापर्यंत एकूण २५३ सामने खेळले आहेत. धोनीनंतर रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिटमॅनने इंडियन प्रीमियर लीगमध्ये २४५ सामने खेळले आहेत. त्याचवेळी, दिनेश कार्तिक २४५ सामने खेळून तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि विराट कोहली २४० सामने खेळून चौथ्या स्थानावर आहे.

राजस्थानकडून अश्विनची दमदार कामगिरी

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आर अश्विनची कामगिरी दमदार राहिली आहे. अश्विनने राजस्थानसाठी आतापर्यंत एकूण ३२ सामने खेळले असून या कालावधीत त्याने २७ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने राजस्थानसाठी फलंदाजी करत २८७ धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या फलंदाजीच्या क्रमवारीत अश्विनला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती, त्या सामन्यात अश्विनने १९ चेंडूत २९ धावांची शानदार खेळी खेळली.

WhatsApp channel