भारताने टी-20 विश्वचषक २०२४ जिंकला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये विराट कोहलीने ५९ चेंडूत सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि २ षटकार मारले.
या शानदार खेळीसाठी विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याचवेळी खराब सुरुवात करूनही भारतीय संघ १७६ धावांपर्यंत मजल मारू शकला. तसेच विराट कोहलीने अंतिम सामना जिंकून आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटला अलविदा केला.
टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन झाल्यावर चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. भारतात पोहोचल्यावर टीम इंडियाची मुंबईत जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्याचवेळी आता विराट कोहलीच्या चाहत्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वास्तविक, भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांनी भव्य रथयात्रा काढली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. पण पोस्टवरील अक्षरांवरून हा व्हिडीओ गुजरातमधील असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने चाहते असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच विराट कोहलीचे एक मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यूजर्स कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटला अलविदा म्हटले आहे. मात्र, तो भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळत राहील. याशिवाय आयपीएलमध्ये दिसणार आहे. आकडेवारीनुसार विराट कोहलीने १२५ टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये या खेळाडूने १३७ च्या स्ट्राइक रेटने आणि ४८.७ च्या सरासरीने ४१८८ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या १२२ धावा होती. त्याचवेळी विराट कोहलीने ३८ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला.