Rashid Khan Ruled Out : अफगाणिस्तानला मोठा धक्का, राशिद खान भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर-rashid khan ruled out from ind vs afg t20 series afghanistan captain ibrahim zadran confirms ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rashid Khan Ruled Out : अफगाणिस्तानला मोठा धक्का, राशिद खान भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर

Rashid Khan Ruled Out : अफगाणिस्तानला मोठा धक्का, राशिद खान भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर

Jan 10, 2024 04:28 PM IST

Rashid Khan Ruled Out : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. राशिद खान या मालिकेतून बाहेर पडला आहे.

Rashid Khan Ruled Out
Rashid Khan Ruled Out (PTI)

Rashid Khan Ruled Out From Ind vs Afg T20 Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ११ जानेवारीपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वीच अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी खेळाडू राशिद खान संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. 

राशिद संपूर्ण मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. राशीदवर सर्जरी झाली आहे. यातून तो अजूनही फिट होऊ शकलो नाही.

वास्तविक, रशीद खानवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. यातून त्याला पूर्णपणे सावरता आलेले नाही. एका चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झादरानने राशीद खान बाहेर झाल्याची माहिती दिली. 

विशेष म्हणजे, अफगाणिस्तानने टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर करताना राशिदला कर्णधार बनवले नव्हते. राशीदबाबत टीम मॅनेजमेंटला आधीच शंका होती. अफगाणिस्तानने गोलंदाजीत नूर अहमद, नवीन-उल-हक, फरीद अहमद मलिक, फजलहक फारुकी, मुजीब-उर-रहमान आणि मोहम्मद सलीम यांचा समावेश केला आहे. 

मुजीबने अनेक वेळा चांगली गोलंदाजी केली आहे. नवीन आणि नूर यांनाही अनुभव आहे. मात्र, भारताला टक्कर देणे या गोलंदाजांसाठी सोपे असणार नाही.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे होणार आहे. हा सामना ११ जानेवारीला होणार आहे. यानंतर १४ जानेवारीला इंदूरमध्ये सामना होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना १७ जानेवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. 

या मालिकेसाठी भारताने रोहित शर्माला कर्णधार बनवले आहे. रोहितसोबत विराट कोहलीही टीम इंडियाचा भाग आहे. संजू सॅमसन, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही संघात स्थान मिळाले आहे.

 

Whats_app_banner