अफगाणिस्तानचा रशीद खान जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणला जातो. विशेषतः टी-20 फॉरमॅटमध्ये रशीद खानला उत्तर नाही. रशीद खान त्याच्या गुगली आणि व्हेरिएशनमुळे फलंदाजांसाठी एक मोठे आव्हान आहे.
अफगाणिस्तान व्यतिरिक्त तो आयपीएल आणि जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळतो. पण राशिद खानचा टी-20 फॉरमॅटमधील रेकॉर्ड तुम्हाला माहीत आहे का? वास्तविक या फॉरमॅटमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. राशिद खानने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ६०० टी-20 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
राशिद खान व्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोलंदाजाने टी-20 फॉरमॅटमध्ये ६०० बळी घेण्याचा पराक्रम केला नाही. राशिद खानच्या T20 कारकिर्दीवर नजर टाकली तर या गोलंदाजाने अफगाणिस्तानसाठी ९३ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. अफगाणिस्तानसाठी, राशिद खानने ६.०८ आणि १४.१४ च्या सरासरीने १५२ फलंदाजांना बाद केले आहे.
राशिद खानने T20 फॉरमॅटमध्ये दोनदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय त्याने ७ सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत. राशिद खानची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे ५ धावांत ३ बळी आहे.
याशिवाय राशिद खानने आयपीएलच्या १२१ सामन्यांमध्ये ६.८२ इकॉनॉमी आणि २१.८३ च्या सरासरीने १४९ विकेट्स घेतल्या आहेत. या लीगमधील राशिद खानची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे २४ धावांत ४ बळी आहे.
अफगाणिस्तान व्यतिरिक्त राशिद खान आयपीएल, बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग, मेजर क्रिकेट लीगसह अनेक लीगमध्ये खेळतो.
अलीकडेच, T20 विश्वचषकात राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाने उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला. मात्र, उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
संबंधित बातम्या