Ranji Trophy Unwanted Record: रणजी करंडकाची सातवी आणि शेवटची फेरी सुरू आहे. दरम्यान, मेघालयाचा सामना अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाशी होत आहे. या सामन्यात मेघालयाच्या नावावर रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रमाची नोंद झाली आहे. शार्दुल ठाकूरच्या किलर बॉलिंगच्या जोरावर मुंबईने मेघालयच्या ६ फलंदाजांना अवघ्या २ धावांत माघारी धाडले. रणजी करंडकाच्या ९१ वर्षांच्या इतिहासात एका संघाने इतक्या कमी धावसंख्येवर आपले ६ विकेट्स गमावले आहेत.
शरद पवार क्रिकेट अकादमीत (बीकेसी) मुंबई आणि मेघालय यांच्यातील सामना सुरू आहे. मेघालय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अवघ्या २ धावांत ६ फलंदाज गमावले. मेघालयाला बॅकफूटवर ढकलण्यात मुंबईच्या शार्दुल ठाकूरने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने आपल्या स्पेलमध्ये हॅट्ट्रिकसह ४ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, मोहित अवस्थ यानेही चांगली गोलंदाजी करत शार्दूलला साथ दिली. या सामन्यात अवस्थीने दोन विकेट मिळवले.
शार्दुल ठाकूरने पहिल्याच षटकात मेघालयाचा सलामीवीर निशांत चक्रवर्तीला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर तिसऱ्या षटकात हॅट्ट्रीक घेत पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले. शार्दूल ठाकूरने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूत बी. अनिरुद्ध, सुमित कुमार आणि जसकीरत यांना शून्यावर बाद करून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली पहिली हॅट्ट्रीक घेतली.
स्कोर | फाइनल स्कोर | टीम | विपक्षी टीम | सीजन |
0-6 | 16 | MCC | सरे | 1872 |
2-6 | 86 | मेघालय | मुंबई | 2024-25 |
3-6 | 32 | ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी | MCC | 1867 |
4-6 | 28 | लीसेस्टरशायर | ऑस्ट्रेलियन लीसेस्टर | 1899 |
4-6 | 60 | नॉर्थम्पटनशायर | केंट | 1907 |
4-6 | 40 | दिल्ली | NWFP | 1938-39 |
4-6 | 27 in 12 ओवर | केरल | मैसूर | 1963-64 |
मेघालयचा संघ ८६ धावांवर आटोपला आहे. ६ विकेट पडल्यानंतर ची सर्वात कमी धावसंख्या ही कोणत्याही संघाने केलेली आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. मेघालयच्या डावात सर्वाधिक धावा हिमानने केल्या. त्याने २४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २८ धावा केल्या.
रणजी ट्रॉफीमध्ये शार्दूल ठाकूरने आतापर्यत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर शार्दूलची भारतीय संघात पुनरागमन होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शार्दूल ठाकूर गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय संघापासून दूर आहे. त्याने २०२३ मध्ये भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
संबंधित बातम्या