Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत आजपासून टीम इंडियाचे हे स्टार खेळणार, सामने लाईव्ह कधी आणि कुठे पाहायचे? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत आजपासून टीम इंडियाचे हे स्टार खेळणार, सामने लाईव्ह कधी आणि कुठे पाहायचे? जाणून घ्या

Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत आजपासून टीम इंडियाचे हे स्टार खेळणार, सामने लाईव्ह कधी आणि कुठे पाहायचे? जाणून घ्या

Jan 23, 2025 09:26 AM IST

Ranji Trophy : रणजी ट्रॉफी २०२४-२५ ची पुढची फेरी आजपासून सुरू होत आहे. या टप्प्यात ७ भारतीय स्टार्स आपापल्या राज्यातील संघांसाठी खेळताना दिसणार आहेत.

Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत आजपासून टीम इंडियाचे हे स्टार खेळणार, सामने लाईव्ह कधी आणि कुठे पाहायचे? जाणून घ्या
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत आजपासून टीम इंडियाचे हे स्टार खेळणार, सामने लाईव्ह कधी आणि कुठे पाहायचे? जाणून घ्या

Ranji Trophy 2025 Date, Live Streaming : रणजी ट्रॉफी २०२४-२५ ची सहावी फेरी आजपासून (२३ जानेवारी) सुरू होत आहे. या टप्प्यात ७ भारतीय स्टार्स आपापल्या राज्याच्या संघांसाठी खेळताना दिसणार आहेत. यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.

 भारतीय संघाने अलीकडेच ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये अत्यंत खराब कामगिरी केली. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दहा कलमी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले आहे.

टीम इंडियाचे स्टार खेळाडू खेळणार

रोहित शर्मा आता २०१५ नंतर रणजी खेळणार आहे, तर यष्टीरक्षक ऋषभ पंत २०१८ नंतर या स्पर्धेत उतरणार आहे. 

भारतीय कर्णधार रोहित शर्मा अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली मुंबईकडून तर ऋषभ पंत आयुष बडोनीच्या नेतृत्वाखाली दिल्लीकडून खेळणार आहे. भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा जयदेव उनाडकट याच्या नेतृत्वाखालील सौराष्ट्रकडून खेळणार आहे.

रणजी ट्रॉफीचे सामने किती वाजता सुरू होतील?

रणजी ट्रॉफी २०२४-२५ चे IST सकाळी ९:३० वाजता सुरू होतील.

रणजी ट्रॉफीचे सामने टीव्हीवर लाइव्ह कसे पाहायचे?

रणजी ट्रॉफी २०२४-२५ चे SD आणि HD या दोन्ही चॅनेलवर स्पोर्ट्स १८ टीव्ही नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील.

रणजी ट्रॉफीच्या सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?

रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

रणजी ट्रॉफीतील आजचे सामने

एलिट गट अ 

• त्रिपुरा विरुद्ध सर्व्हिसेस: एमबीबी स्टेडियम, आगरतळा 

• महाराष्ट्र विरुद्ध बडोदा: गोल्फ क्लब ग्राउंड, नाशिक,

 (स्टार्स इन ॲक्शन: ऋतुराज गायकवाड) 

• मुंबई विरुद्ध जम्मू-काश्मीर: शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी, मुंबई, 

(स्टार्स इन ॲक्शन: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर) 

• मेघालय विरुद्ध ओडिशा: MCA क्रिकेट ग्राउंड, पोलो ग्राउंड, शिलाँग.

एलिट गट ब 

• गुजरात विरुद्ध उत्तराखंड: गुजरात कॉलेज क्रिकेट ग्राउंड 'अ', अहमदाबाद 

• हैदराबाद विरुद्ध हिमाचल प्रदेश: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद 

• पाँडेचेरी विरुद्ध आंध्र: सिचेम स्टेडियम, पुडुचेरी • राजस्थान विरुद्ध विदर्भ: केएल सैनी स्टेडियम, जयपूर

एलिट ग्रुप सी 

कर्नाटक वि. पंजाब एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर 

(स्टार्स इन ॲक्शन: शुभमन गिल, देवदत्त पडिककल

बंगाल विरुद्ध हरियाणा: बंगाल क्रिकेट अकादमी मैदान, कल्याणी 

• बिहार विरुद्ध उत्तर प्रदेश: मोईन उल हक स्टेडियम, पाटणा 

• केरळ विरुद्ध मध्य प्रदेश: स्पोर्ट्स हब इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, त्रिवेंद्रम

 एलिट ग्रुप डी 

• आसाम विरुद्ध रेल्वे: एसीए स्टेडियम, बारसापारा, गुवाहाटी 

• तामिळनाडू विरुद्ध चंदीगड: सेलम क्रिकेट फाउंडेशन ग्राउंड, सेलम 

• झारखंड विरुद्ध छत्तीसगड: कीनन स्टेडियम, जमशेदपूर 

• सौराष्ट्र विरुद्ध दिल्ली: निरंजन शाह स्टेडियम ग्राउंड सी, राजकोट 

(स्टार्स इन ॲक्शन: चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत)

Whats_app_banner

संबंधित बातम्या