Kerala vs Vidarbha Ranji Trophy Final : रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना केरळ आणि विदर्भ संघांमध्ये खेळला जात आहे. रणजी ट्रॉफीच्या या फायनलमध्ये केरळचा कर्णधार सचिन बेबी याचे शतक अवघ्या २ धावांनी हुकले. सचिनने फायनलमध्ये अप्रतिम खेळी खेळली पण त्याच्या दुर्दैवामुळे त्याला त्याचे शतकात रूपांतर करता आले नाही. दोन्ही संघांमधील हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. आज (२८ फेब्रुवारी) या सामन्याचा तिसरा दिवस होता.
सचिन बेबी बाद झाला तेव्हा केरळची धावसंख्या ३२४/७ होती. त्याची ही शानदार खेळी पार्थ रेखाडे याने संपुष्टात आणली. रेखाडेने सचिनला करुण नायरकरवी झेलबाद केले. सचिन बेबीने २३५ चेंडूत ९८ धावा केल्या, या खेळीत त्याने १० चौकार मारले.
केरळचा डाव ३४२ धावांवर संपला. पहिल्या डावाच्या जोरावर विदर्भाने ३७ धावांची आघाडी मिळवली आहे. या डावात सचिन बेबीशिवाय आदित्य सरवटेने केरळसाठी ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीत त्यानेही १० चौकार मारले. यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनने ३४ धावा केल्या.
विदर्भाकडून दर्शन नळकांडेने ३ बळी घेतले. पार्थ रेखाडे आणि हर्ष दुबे यांनीही प्रत्येकी ३ बळी घेतले. यश ठाकूरला १ विकेट मिळाली.
यापूर्वी दानिश मलेवारने विदर्भासाठी पहिल्या डावात १५३ धावांची शानदार खेळी केली होती. करुण नायरने पुन्हा एकदा चांगली खेळी केली, त्याने १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ८६ धावा केल्या. विदर्भाने पहिल्या डावात ३७९ धावा केल्या होत्या.
केरळसाठी इडन ऍपल टॉम आणि एमडी निदेश (मटकाकंदिल दिनेश निदेश) यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. नेदुमनकुझी बासिलने २ तर जलज सक्सेनाने १ बळी घेतला.
संबंधित बातम्या