मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji trophy 2024 : मुंबईच्या गोलंदाजांनी चमत्कार घडवला, १०व्या आणि ११व्या क्रमांकावर येऊन ठोकली शतकं

Ranji trophy 2024 : मुंबईच्या गोलंदाजांनी चमत्कार घडवला, १०व्या आणि ११व्या क्रमांकावर येऊन ठोकली शतकं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 27, 2024 02:42 PM IST

Tushar Deshpande Century, ranji trophy 2024 : मुंबईसाठी तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी १०व्या आणि ११व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतके झळकावली.

Tushar Deshpande Century
Tushar Deshpande Century (X)

Mumbai vs Baroda Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी २०२३-२४ चा दुसरा उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि बडोदा यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात अनोखा विक्रम घडला आहे. मुंबईसाठी १० व्या आणि ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या खेळाडूंनी शतके झळकावली आहेत.

मुंबईसाठी तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे (Tanush Kotian Tushar Deshpande) यांनी १०व्या आणि ११व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतके झळकावली.

वास्तविक, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने पहिल्या डावात ३८४ धावा केल्या होत्या. यानंतर बडोद्याने पहिल्या डावात ३४८ धावा केल्या. 

यानंतर मुंबईचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी आला, त्यांनी दुसऱ्या डावात सर्वबाद ५६९ धावा केल्या. यादरम्यान तनुष कोट्यीयन १०व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि तुषार ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तनुषने १२९ चेंडूत नाबाद १२० धावा केल्या. त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले. तर तुषारने १२९ चेंडूत १२३ धावा केल्या. त्याने १० चौकार आणि ८ षटकार मारले.

अशाप्रकारे तुषार आणि तनुषने जवळपास ७८ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. १९४६ मध्ये, भारतीय खेळाडू चंदू सरवटे आणि शुटे बॅनर्जी यांनी सरेविरुद्धच्या सामन्यात १० आणि ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतके झळकावली होती. आता तुषार आणि तनुषनेही असाच पराक्रम केला आहे.

पहिल्या डावात मुशीचं द्विशतक

मुंबईने पहिल्या डावात ३८४ धावा केल्या होत्या. यादरम्यान मुशीर खानने ३५७ चेंडूंचा सामना करताना नाबाद २०३ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने १८ चौकार मारले. यानंतर मुंबईसाठी हार्दिक तामोरेने दुसऱ्या डावात शतक झळकावले. त्याने २३३ चेंडूंचा सामना करताना ११४ धावा केल्या. त्याने १० चौकार मारले. पृथ्वी शॉने ८७ धावांची खेळी खेळली. ९३ चेंडूंचा सामना करताना त्याने १० चौकार आणि २ षटकार मारले.

तर बडोद्यासाठी शाश्वत रावतने पहिल्या डावात शतक झळकावले होते. त्याने १९४ चेंडूंचा सामना करताना १२४ धावा केल्या. या खेळीत त्याने १५ चौकार मारले. कर्णधार विष्णू सोलंकीनेही शतक झळकावले. त्याने २९१ चेंडूत १३६ धावा केल्या. आता दुसरा डाव खेळत आहे.

IPL_Entry_Point