मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy Live Streaming : उद्यापासून रंगणार रणजी ट्रॉफीचा थरार, या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार सामने

Ranji Trophy Live Streaming : उद्यापासून रंगणार रणजी ट्रॉफीचा थरार, या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार सामने

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 04, 2024 07:09 PM IST

ranji trophy 2024 : रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण ३८ संघ खेळताना दिसणार आहेत. २ महिने चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना १० मार्चला खेळला जाईल.

ranji trophy 2024
ranji trophy 2024 (PTI)

भारतातील सर्वात मोठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2023-24) ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी गुजरात विरुद्ध तामिळनाडू, कर्नाटक विरुद्ध पंजाब आणि हरियाणा विरुद्ध राजस्थान यांच्यात सामने रंगणार आहेत.  रणजी ट्रॉफीच्या गेल्या मोसमात सौराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले होते. 

सौराष्ट्र यंदा सर्वात कठीण गटात

यावेळी गतविजेत्या सौराष्ट्र संघाला बलाढ्य संघांसह सर्वात कठीण गटात ठेवण्यात आले आहे. अ गटात सौराष्ट्रासह विदर्भ आणि हरियाणाचे संघ आहेत. तर ग्रुप-बी मध्ये आंध्र आणि आसाम व्यतिरिक्त बंगालचा संघ आहे. 

रणजी ट्रॉफीचे गट आणि संघ

एलिट अ गट - सौराष्ट्र, झारखंड, महाराष्ट्र, राजस्थान, विदर्भ, हरियाणा, सर्व्हिसेस, मणिपूर.

एलिट ब गट - बंगाल, आंध्र, मुंबई, केरळ, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार.

एलिट क गट - कर्नाटक, पंजाब, रेल्वे, तामिळनाडू, गोवा, गुजरात, त्रिपुरा, छत्तीसगड.

एलिट ड गट - मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बडोदा, दिल्ली, ओरिसा, पाँडेचेरी, झारखंड.

प्लेट ग्रुप - नागालँड, हैदराबाद, मेघालय, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश.

रणजी ट्रॉफी कोणत्या मैदानांवर खेळली जाईल?

रणजी ट्रॉफी २०२३-२४ चे सामने देशभरातील अनेक ठिकाणी खेळवले जातील. यात एकूण ४८ मैदानांवर सामने खेळले जाणार आहेत. तर प्लेट गटाचे लीग टप्प्यातील सामने ५ ठिकाणी आयोजित केले जातील.

रणजी ट्रॉफी सामन्यांचे कोणत्या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार

रणजी ट्रॉफी सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर होणार आहे. तर Jio Cinema अ‍ॅपद्वारे चाहते या सामन्यांच्या ऑनलाइन स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात.

WhatsApp channel