मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy : पुण्याच्या क्रिकेट स्टेडियमवरील मोठी दुर्घटना टळली, खेळाडू थोडक्यात बचावले

Ranji Trophy : पुण्याच्या क्रिकेट स्टेडियमवरील मोठी दुर्घटना टळली, खेळाडू थोडक्यात बचावले

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 15, 2024 11:13 AM IST

Ranji Trophy 2024 : पुणे येथे रणजी सामन्यादरम्यान मैदानावरील साईटस्क्रीन पडल्याची घटना घडली. या अपघातामुळे सामना सुमारे ३० मिनिटे थांबवावा लागला

ranji trophy 2024
ranji trophy 2024

Maharashtra Vs Jharkhand Ranji Trophy 2024: रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र आणि झारखंड यांच्यात १२ जानेवारीपासून सामना खेळला जात आहे. एलिट गट अ मधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) खेळवला जात आहे. पण या सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

चांगली गोष्ट म्हणजे यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. या अपघातातून खेळाडू थोडक्यात बचावले. ही घटना सामन्याच्या दुसऱ्या दिवशी घडली.

सामन्यात तीन दिवसांत ४ शतके 

या सामन्यात झारखंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४०३ धावा केल्या. संघाकडून कर्णधार विराट सिंगने सर्वाधिक १०८ धावांची खेळी खेळली. तर कुमार सूरजने ८३ आणि शाहबाज नदीमने ४१ धावा केल्या.

प्रत्युत्तरात महाराष्ट्र संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात ४ बाद ५४३ धावा केल्या. संघाकडून कर्णधार केदार जाधवने १८२ धावांची खेळी केली. पवन शहाने १३६ धावांची तर अंकित बावणेने ११४ धावांची दमदार खेळी केली.

मैदानावरील साईटस्क्रीन पडली

याच पु. जोरदार वाऱ्यामुळे हा अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा झारखंडचा डाव संपला होता आणि इनिंग ब्रेक झाला होता.

इनिंग्स ब्रेकमुळे सर्व खेळाडू त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये होते. त्यामुळेच खेळाडू थोडक्यात बचावले आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर ग्राउंड स्टाफने तत्परता दाखवली आणि साईटस्क्रीन त्वरीत दुरुस्त करण्यात आली. यानंतर सामना सुरू झाला.

पावसामुळे साईटस्क्रीन खराब झाली

काही दिवसांपूर्वी शहरात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळेच संघांना सामन्यापूर्वी सरावही करता आला नाही. या पावसामुळे या साईटस्क्रीनची फ्रेम खराब झाली, असे एमसीएकडून सांगण्यात आले. 

पुण्याच्या या स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपचे ५ सामने झाले होते. २०१२ मध्ये या स्टेडियमची बांधणी झाली आहे. या मैदानावर आतापर्यंत ५१ आयपीएल सामने खेळले गेले आहेत. तसेच, आतापर्यंत दोन कसोटी, ४ T20 आणि १२ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत.

WhatsApp channel