अब्दुल समदने रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या फलंदाजाने केला असा पराक्रम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  अब्दुल समदने रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या फलंदाजाने केला असा पराक्रम

अब्दुल समदने रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या फलंदाजाने केला असा पराक्रम

Oct 21, 2024 03:22 PM IST

Abdul Samad, Ranji Trophy : अब्दुल समदने रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये ओडिशाविरुद्धच्या सामन्यात जम्मू-काश्मीरसाठी दमदार फलंदाजी केली. त्याने सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली आहेत.

अब्दुल समदने रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या फलंदाजाने केला असा पराक्रम
अब्दुल समदने रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या फलंदाजाने केला असा पराक्रम

कटक येथील बाराबती स्टेडियमवर ओडिशा आणि जम्मू-काश्मीर यांच्यात रणजी करंडक सामना खेळला जात आहे. या सामन्यात जम्मू-काश्मीरचा कर्णधार पारस डोग्रा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

यानंतर जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात २७० धावा केल्या. ओडिशानेही विरोधी संघाला कडवी झुंज दिली आणि पहिल्या डावात २७२ धावा केल्या. अशा प्रकारे त्यांना दोन धावांची किरकोळ आघाडी मिळाली. आता जम्मू-काश्मीरने २७० धावा करून दुसरा डाव घोषित केला आहे. पण अब्दुल समद याने जम्मू-काश्मीरसाठी मोठा चमत्कार केला आहे.

अब्दुल समदने दमदार फलंदाजी केली

२२ वर्षीय युवा फलंदाज अब्दुल समदने जम्मू-काश्मीरसाठी अप्रतिम फलंदाजी केली आहे. खेळाने सर्वांना प्रभावित करण्यात तो यशस्वी ठरला आहे. समदने ओडिशाविरुद्धच्या सामन्याच्या दोन्ही डावांत शतके झळकावली असून यासह त्याने इतिहास रचला आहे. 

तो कोणत्याही रणजी ट्रॉफी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा जम्मू-काश्मीरचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती.

समदने दोन्ही डावात शतके झळकावली

जम्मू-काश्मीरची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. जेव्हा अभिनव पुरी आणि शुभम खजोरिया लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर अब्दुल समदने क्रीजवर फलंदाजी करताना संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. त्याने ११७ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांसह १२७ धावा केल्या. त्याच्यामुळेच संघाला २७० धावांपर्यंत मजल मारता आली.

यानंतर दुसऱ्या डावातही त्याने शतक झळकावले. त्याने १०८ चेंडूत १०८ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ६ षटकार मारले. संघाकडून दुसऱ्या डावात शुभम पुंडीरने ४० आणि शुभम खजोरियाने ४३ धावा केल्या. जम्मू-काश्मीरने २७० धावांवर दुसरा डाव घोषित केला.

आयपीएलमध्ये सनरायझर्य हैदराबादचा फिनीशर

अब्दुल समद आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. त्याला हैदराबाद संघाने २०२० मध्ये २० लाख रुपयांना विकत घेतले होते. त्याने आतापर्यंत ५० आयपीएल सामन्यांमध्ये ५७७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट १४६.०८ आहे. तो वेगवान धावा काढण्यासाठी ओळखला जातो आणि त्याच्याकडे स्फोटक फलंदाजी आहे. लांब षटकार मारण्याची कलाही त्याच्याकडे आहे.

Whats_app_banner