Ranji Trophy : तनुष कोटियन ते सारांश जैन! या खेळाडूंना लवकरच येणार टीम इंडियाचा कॉल? IPL ऑक्शनमध्येही मोठी बोली लागणार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy : तनुष कोटियन ते सारांश जैन! या खेळाडूंना लवकरच येणार टीम इंडियाचा कॉल? IPL ऑक्शनमध्येही मोठी बोली लागणार

Ranji Trophy : तनुष कोटियन ते सारांश जैन! या खेळाडूंना लवकरच येणार टीम इंडियाचा कॉल? IPL ऑक्शनमध्येही मोठी बोली लागणार

Published Oct 13, 2024 04:13 PM IST

.यंदाचा रणजी ट्रॉफीचा थरार सुरू झाला आहे. यामध्ये अनेक खेळाडूंवर भारतीय क्रिकेट मॅनेजमेंटची नजर आहे. जे चांगले कसोटीपटू होऊ शकतात.

Ranji Trophy : तनुष कोटियन ते सारांश जैन! या खेळाडूंना लवकरच येणार टीम इंडियाचा कॉल? IPL ऑक्शनमध्येही मोठी बोली लागणार
Ranji Trophy : तनुष कोटियन ते सारांश जैन! या खेळाडूंना लवकरच येणार टीम इंडियाचा कॉल? IPL ऑक्शनमध्येही मोठी बोली लागणार

रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा हंगाम ११ ऑक्टोबरपासून सुरू झाला. दरवेळेप्रमाणेच यावेळीही रणजीमध्ये सर्वांच्या नजरा अशा खेळाडूंवर आहेत, ज्यांना टीम इंडियाचे भविष्य म्हणून पाहिले जाऊ शकते. अशा स्थितीत आपण येथे अशाच काही खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांना लवकरच टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते. सोबतच आगामी आयपीएल ऑक्शनमध्ये चांगली किंमत मिळू शकते.

१) अभिमन्यू ईश्वरन

बंगालचा स्टार फलंदाज अभिमन्यू ईश्वरन अनेक दिवसांपासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत ९८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७५०६ धावा केल्या आहेत. या मोसमातही त्याच्या बॅटमधून धावा आल्या तर त्याचा टीम इंडियात समावेश होऊ शकतो.

२) तनुष कोटियन

मुंबईकडून खेळणारा फिरकी अष्टपैलू खेळाडू सध्या चर्चेत आहे. इराणी कपमध्ये मुंबईकडून खेळताना तनुषने ६४ आणि ११४* धावांची इनिंग खेळली होती. याशिवाय त्याने या सामन्यात ३ विकेट्सही घेतल्या. तनुषला लवकरच टीम इंडियाकडून लवकरच बोलावणे येऊ शकतो. तो आर अश्विन निवृत्त झाल्यावर तो त्याचा योग्य रिप्लेसमेंट ठरू शकतो.

३) सरांश जैन

मध्य प्रदेशकडून खेळणारा सरांश जैन हाही सतत चमत्कार करताना दिसतो. इराणी चषक स्पर्धेत शेष भारताकडून खेळताना सरांशने एकूण ७ विकेट घेतल्या होत्या. सरांशने आतापर्यंत ३५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.

४) मानवी सुतार

राजस्थानकडून खेळणारा मानव सुथार नुकत्याच झालेल्या इराणी चषकात शेष भारताकडून खेळताना दिसला. मानव फर्स्ट क्लासमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्याने टीम इंडियाकडून अंडर १९ वर्ल्डकपही खेळला होता.

५) शम्स मुलाणी

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळणारा फिरकी अष्टपैलू शम्स मुलाणीवरही सर्वांच्या नजरा असतील. इराणी कप २०२४ शम्स मुंबईकडून खेळताना दिसला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या