Ramandeep Singh : करिअरची सुरुवात असावी तर अशी, पदार्पणाच्या सामन्यातच रमणदीपनं सूर्यासारखी खास कामगिरी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ramandeep Singh : करिअरची सुरुवात असावी तर अशी, पदार्पणाच्या सामन्यातच रमणदीपनं सूर्यासारखी खास कामगिरी

Ramandeep Singh : करिअरची सुरुवात असावी तर अशी, पदार्पणाच्या सामन्यातच रमणदीपनं सूर्यासारखी खास कामगिरी

Nov 14, 2024 11:01 AM IST

Ramandeep Singh 1st Ball Six : रमनदीप सिंगने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर षटकार मारून इतिहास रचला. त्याने या विक्रमात सूर्यकुमार यादवची बरोबरी केली.

Ramandeep Singh : करिअरची सुरुवात असावी तर अशी, पदार्पणाच्या सामन्यातच रमणदीपनं सूर्यासारखी खास कामगिरी
Ramandeep Singh : करिअरची सुरुवात असावी तर अशी, पदार्पणाच्या सामन्यातच रमणदीपनं सूर्यासारखी खास कामगिरी (AP)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना बुधवारी सेंच्युरियन येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने आफ्रिकेने ११ धावांनी पराभव केला. या सामन्यातून रमणदीप सिंगने याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पंजाबच्या या अष्टपैलू खेळाडूने शानदार फलंदाजी करत अवघ्या ६ चेंडूत १५ धावा केल्या. पण टीम इंडियासाठीच्या पहिल्याच सामन्यात त्याने ज्याप्रकारे चमकदार कामगिरी केली ती खूपच प्रभावी होती.

भारताची धावसंख्या १९०/५ असताना रमणदीप सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. १८व्या षटकातील शेवटचा चेंडू रमणदीपचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला चेंडू होता आणि त्याने या त्याच्या करिअरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. अँडिले सिमेलेने फुल लेंथ चेंडू टाकला, यावर रमणदीपने मिड-ऑनवर षटकात षटकार मारून आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा रमनदीप सिंग हा भारतातील दुसरा फलंदाज ठरला आहे. अनेकदा एखादा खेळाडू जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवतो तेव्हा तो हवाई शॉट  खेळणे टाळतो.  पण हा नवा भारत आहे आणि रमनदीप हा नव्या टीम इंडियाचा उदयोन्मुख ताराही आहे. अशा परिस्थितीत त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचण्यास मागेपुढे पाहिले नाही.

रमनदीप सिंगच्या आधी फक्त सूर्यकुमार यादव यानेच भारतासाठी अशी कामगिरी केली होती. २०२१ मध्ये सूर्याने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात षटकार मारून आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती.

दरम्यान, या सामन्यात रमनदीपला ६ चेंडू खेळण्याची संधी मिळाली आणि तो १५ धावा करून रन आऊट झाला. त्याने आपल्या डावात एका षटकाराबरोबरच एक चौकार ही मारला.

सामन्यापूर्वी रमनदीप सिंगला व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हार्दिक पांड्याने पदार्पणाची कॅप दिली. व्हीव्हीएसने हार्दिकला कॅप दिली, जी हार्दिकने रमनदीप सिंगकडे सोपवली. रमनदीप सिंग हादेखील हार्दिक पांड्यासारखाच वेगवान अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएल व्यतिरिक्त तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजी करतो, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या सामन्यात त्याला गोलंदाजी दिली नाही. वेगवान गोलंदाज आवेश खानच्या जागी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान देण्यात आले होते.

Whats_app_banner